झोपड्यांमध्ये सुरू असलेले वराहपालन.
झोपड्यांमध्ये सुरू असलेले वराहपालन.  
मुंबई

सिडकोच्या राखीव भूखंडावर बेकायदा वराहपालन  

सकाळ वृत्तसेवा

 खारघर : खारघरमध्ये अनधिकृतपणे झोपड्या आणि शेड उभारून वराहपालन केले जात आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांकडून आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

खारघर सेक्‍टर- १६ मधील मलनिःसारणच्या मागील बाजूस असलेल्या सिडकोच्या राखीव जागेवर काही जण अनधिकृत झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहेत; तर एका व्यक्तीने बेकायदा शेड बांधून वराहपालनचा व्यवसाय थाटला आहे. वराहपालनामुळे शेडमधून निघणाऱ्या मलयुक्त घाणीमुळे दुर्गंधी पसरली आहे.

सिडकोकडून खारघरमध्ये अनेक वेळा कारवाई झाली; मात्र वराहपालन व्यवसाय करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. या ठिकाणी मलनिःसारण केंद्राच्या भिंतीला लागून शेड उभारली आहे. मात्र याबाबत साधी तक्रारदेखील केली नसल्याचे समजते. वराहपालन शेडपासून काही अंतरावर सिडकोची वास्तुविहार सेलिब्रेशन वसाहत आहे. त्यामुळे सिडकोने अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या झोपड्या आणि बेकायदा उभारलेल्या शेडवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांडून केली जात आहे.

मलनिःसारण केंद्रालगत असलेल्या झोपड्यांवर पावसाळ्यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. पोलिस बंदोबस्त मिळाल्यास झोपड्या आणि वराहपालन शेडवर कारवाई केली जाईल.
 - विशाल ढगे, सहायक बांधकाम नियंत्रक अधिकारी, सिडको

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT