मुंबई

लॉकडाऊनचा गैरफायदा उचलत आरेमध्ये अवैध भराव; वन्य जीवसृष्टीला धोका

मिलिंद तांबे


मुंबई : लॉकडाऊनचा फायदा उचलत आरे परिसरात मोठ्या प्रमाणात राडारोडा तसेच मातीचा अवैध भराव करण्यात येत आहे. यामुळे आरेमधील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी पर्यावरणवाद्यांनी मुंबई जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. जोगेश्वरी - विक्रोळी जोडरस्त्याला लागून असलेल्या परिसरात हा भराव टाकण्यात येत आहे. त्यामुळे एमएमआरसीएएल यार्ड ते एल अँड टी च्या दरम्यान माती आणि रोडारोड्याचे मोठे ढिगारे दृष्टीस पडतात. गेल्या महिन्यभरापासून भराव टाकण्याचे काम सुरू असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.

'आरे'चा परिसर शासनाने जंगल म्हणून घोषीत केला आहे. तिथे कोणत्याही प्रकारचे अवैध बांधकाम किंवा भराव टाकण्यास बंदी आहे. मात्र लॉकडाऊनचा फायदा उचलत काही भुमाफिया हा भराव करत असल्याचा संशय वनशक्ती चे प्रमुख स्टॅलिन दयानंद यांनी व्यक्त केला आहे. भराव टाकून भुखंड तयार करायचा व त्यावर अवैध झोपड्या उभा करण्याचा यामागे डाव असण्याची शक्यता ही त्यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आपण मुंबई पोलिस , जिल्हाधिका-यांसह पर्यावरणमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली असल्याचे ही स्टॅलिन यांनी सांगितले. घटनास्थळाचे काही छायाचित्र ही पाठवले असून इथली एकूण परिस्थिती त्यांच्या समोर सादर केल्याचे ही त्यांनी सांगितले. याची दखल घेऊन संबंधित विभागाने त्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी ही स्टॅलिन यांनी केली आहे.

Illegal filling in the array taking advantage of the lockdown Threat to wildlife

--------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT