Dombivli Crime News sakal
मुंबई

Dombivli Crime News : गुटख्याच्या कारखान्यावर कल्याण गुन्हे शाखेचा छापा ; 17 लाखाचा गुटखा व इतर साहित्य जप्त

गुटख्याच्या विक्रीस मनाई असताना कल्याण जवळील कुसवली गावात चक्क गुटखा बनविणारा करखानाच आढळून आला आहे. कल्याण गुन्हे शाखा घटक 3 ने अवैध गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून 3 जणांना अटक केली आहे तर दोन जण फरार झाले आहेत. यामध्ये एकूण 17 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : गुटख्याच्या विक्रीस मनाई असताना कल्याण जवळील कुसवली गावात चक्क गुटखा बनविणारा करखानाच आढळून आला आहे. कल्याण गुन्हे शाखा घटक 3 ने अवैध गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून 3 जणांना अटक केली आहे तर दोन जण फरार झाले आहेत. यामध्ये एकूण 17 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुटखा विक्रीस मनाई आदेश असताना कल्याण डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत होती. हा गुटखा कोठून आणला जातो याचा थांगपत्ता पोलिसांना लागत नसताना इथे कारखानाच मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखाची विक्री केली जात आहे. यापूर्वी टाकलेल्या छापेमारीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुटखाची जप्ती केली आहे. मात्र या गुटख्याचा पुरवठा कोठून होत आहे याचा शोध घेण्यात पोलिसांना यश येत नव्हते. त्यातच कल्याण गुन्हे शाखा युनिट 3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगले यांना माहिती मिळाली की मंगळवारी काही इसम हे बदलापूर पाईपलाईन रोड वरील निसर्ग हॉटेल जवळ चार चाकी वाहनाने अवैध गुटख्याची वाहतूक करून घेऊन जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेने तेथे सापळा रचला. बदलापूरहून काटई नाका दिशेकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये 7 लाख 58 हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा आढळून आला.

पोलिसांनी कारमधील विराज आलिमकर (वय 24), मोहम्मद उमर अब्दुल रेहमान (वय 35) आणि मोहम्मद तारीक अलिकादर खान (वय 21) यांना ताब्यात घेतले. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे तिन्ही आरोपी व त्यांचे आणखीन दोन साथीदार हे मिळून हाजी मलंग रोडवरील कुसवली गावाजवळ अवैध गुटखा बनविण्याचा कारखाना चालवीत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी कुसवली गावातील निर्जन ठिकाणी शेतात असलेल्या एका कारखान्यावर छापा मारत कारवाई केली असता, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा बनविण्याकरता लागणारे साहित्य, दोन मोठ्या मशीन व इतर कच्चा माल सुगंधीयुक्त सुपारी, विमल पान मसाला, राज निवास पान मसाला तसेच जाफरानी जर्दा तंबाखू व इतर कच्चामाल असा सुमारे 17 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

सदर आरोपी हे गुटखा बनविण्यासाठी लागणारी सुपारी व कच्चा माल सुरत येथून कल्याणमध्ये आणायचे,शेतातील कारखान्यावर सुपारीवर प्रक्रिया करून त्यापासून गुटखा बनविला जात होता अशी माहिती गुन्हे शाखेने दिली. आरोपींच्या अन्य दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत असून या गुटख्याची कोठे कोठे विक्री केली जात होती. आणखी असे अवैध गुटख्याचे कारखाने आहेत का ? याचा तपास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT