मुंबई

रस्ता सुरक्षेबाबत बेकायदा फलकबाजी 

सकाळ वृत्तसेवा

खारघर : खारघर शहराचा चेहरामोहरा विद्रूप करण्याची मोहीम नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने राबवण्यात येत आहे. पालिकेची कोणतीही परवानगी न घेता वाहतूक पोलिसांनी सुरक्षा सप्ताहासंदर्भात खारघर परिसरात जनजागृतीचे फलक लावून शहराचे वैभव असणाऱ्या उत्सव चौकालाच विद्रूप केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

खारघर परिसरात सिडकोने उत्सव चौक आणि शिल्प चौक उभारले आहे. या दोन्ही शिल्पाच्या लगत असलेल्या रस्त्याच्या कडेला नागरिक विसावा घेतात; तर सकाळ-संध्याकाळी शिल्पावर लावण्यात आलेले कारंजे पाहण्यासाठी नागरिकांची वर्दळ असते; मात्र या दोन्ही शिल्पाच्या भोवती नवी मुंबई पोलिस आयुक्तालय वाहतूक विभागाकडून रस्ता सुरक्षा अभियान जनजागृतीबाबत फलक लावून शिल्पाचे विद्रूपीकरण केले जात आहे. 

खारघर शहर स्वच्छ आणि सुंदर असावे, यासाठी पालिकेकडून परिसरात अनधिकृतपणे लावण्यात आलेले फलक हटविले जातात; मात्र नवी मुंबई वाहतूक विभागाकडून खारघरमधील मुख्य चौक आणि रस्त्यावर लावण्यात आलेल्या फलकांमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. याविषयी पालिकेच्या खारघर येथील कार्यालयात विचारणा केली असता खारघर परिसरात लावण्यात आलेल्या फलकाविषयी परवानगी घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वाहतूक पोलिसच नियम पायदळी तुडवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

वाहतूक विभागाकडून हेल्मेट आणि रस्ता सुरक्षेविषयी काही मुख्य ठिकाणी फलक लावणे आवश्‍यक होते; मात्र वाहतूक विभागाकडून खारघर परिसरात मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी अनधिकृत फलकाविषयी मुंबई उच्च न्यालयाकडून नाराजी व्यक्त केली होती; मात्र वाहतूक पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. 
- गणेश बनकर, मनसे पदाधिकारी, खारघर 

खारघरमध्ये लावण्यात आलेल्या फलकांविषयी पालिकेच्या खारघर कार्यालयातून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. 
- श्रीराम हजारे, प्रभाग अधिकारी, खारघर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT