मुंबई

खासगी रुग्णालयात ताप सर्वेक्षण कक्ष 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे ः कोविड 19 या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी सरकारने राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रातील काही खासगी रुग्णालयांमध्ये तातडीने ताप सर्वेक्षण बाह्यरुग्ण कक्ष तातडीने सुरू करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी तथा महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी संबंधित रुग्णालयाच्या प्रशासनास दिले आहेत. 
महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे वर्गीकरण रुग्णांलयानी करावयाचे आहे. वर्गीकरण 1 मध्ये जे नागरिक गेल्या 28 दिवसात परदेशातून आलेले आहेत, त्यांची तपासणी करावयाची आहे. यासाठी शासकीय रुग्णालय- ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, कौशल्या मेडिकल फाऊंडेशन-पाचपाखाडी, ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल, होरायजन हॉस्पिटल- घोडबंदर, बेथनी हॉस्पिटल, जितो हॉस्पिटल, वेदांत हॉस्पिटल घोडबंदर रोड, रेहमानीया हॉस्पिटल, काळसेकर हॉस्पिटल, कौसा मुंब्रा येथे तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 
वर्गीकरण 2 मध्ये परदेशी प्रवास करून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची तपासणी व वर्गीकरण 3 मध्ये ज्यांना कफ, घसादुखी, थंडी वाजणे अशी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांचे वर्गीकरण करून खासगी रुग्णालयांनी तपासणी करावयाची आहे. यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील कौशल्या मेडिकल फाऊंडेशन, क्रिटीकेअर सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटल, ठाणे हेल्थ केअर, ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल, रेहमानीया हॉस्पिटल, बेथनी हॉस्पिटल, मेट्रोपोल मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटल-एलएलपी, सिद्धिविनायक मॅटनिर्टी ऍण्ड जनरल हॉस्पिटल, वेदांत हॉस्पिटल-घोडबंदर रोड, हायलॅण्ड सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, जिथो एज्युकेशनल ऍण्ड मेडिकल ट्रस्ट, काळसेकर हॉस्पिटल-मुंब्रा, कोपरी हेल्थ सेंटर, शिवाजीनगर हेल्थ सेंटर-पडवळनगर वागळे इस्टेट, आयुर्वेदिक डिस्पेन्सरी- दादोजी कोंडदेव स्टेडियम, मानपाडा हेल्थ सेंटर, शिळ हेल्थ सेंटर- शीळफाटा, कौसा हेल्थ सेंटर, लोकमान्य कोरस हेल्थ सेंटर- लोकमान्यनगर, रोझा गार्डनिया कासारवडवली, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय- कळवा, शासकीय रुग्णालय ठाणे येथे सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 
कोविड 19 या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी राज्यभर प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या असून महापालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 14 कोरोना कोविड 19 रुग्णांचे निदोन झाले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या "हायरिस्क' आणि "लो रिस्क' रुग्णांच्या तपासण्या सुरू आहेत. तसेच ज्या खासगी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा आदी प्रकारच्या तक्रारी आहेत, अशा रुग्णांना स्वतंत्र बाह्यरुग्ण कक्षात तपासणीसाठी किमान 1 ते दीड मीटर अंतरावर उभे करून त्यांची तपासणी करावी. यापैकी संशयित कोरोना कोविड 19 रुग्णांना निदान व उपचार करण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या सूचना खासगी रुग्णालयांना ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. 
................. 
संशयितांची यादी पाठवण्याचे आवाहन 
संशयित कोरोना कोविड 19 रुग्णांपैकी ज्या रुग्णांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचा संशय वैद्यकीय तज्ज्ञांना आलेला असेल अशा रुग्णांच्या तपासण्या करून निश्‍चित निदान करण्यासाठी शासनमान्य तपासणी केंद्राकडे अथवा मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडे पाठवावे. तसेच दैनंदिन तपासणी केलेल्या रुग्णांपैकी कोरोना कोविड 19 संशयित अथवा बाधित रुग्णांची यादी ठाणे महापालिकेच्या tmchqncov2019@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याबाबतच्या सूचना खासगी रुग्णालयांना ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात येत आहेत. 

nmo{bgm§Mm VmU dmT>dy ZH$m
https://www.esakal.com/mumbai/do-not-increase-unwanted-stress-police-force-says-mumbai-high-276968

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! तरुणावर ८ जणांचा गोळीबार, जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी; घटनेनं खळबळ

IND vs ENG 3rd ODI: वॉशिंग्टन सुंदर OUT, रोहित शर्मावर सस्पेन्स कायम! तिसऱ्या वन डेत कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Latest Marathi News Live Update : जंतर मंतरवरील आंदोलनात गोंधळ, अभिजीत दीपकेंवर शाईफेक

भारताच्या अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास! देशातील पहिलं खाजगी ऑर्बिटल रॉकेट 'Vikram-1' लाँच

Credit Card Rule: क्रेडिट कार्डवर किती खर्च करावा? पगाराच्या ‘या’ टक्क्यांपेक्षा जास्त खर्च पडू शकतो महागात; पाहा नियम

SCROLL FOR NEXT