Celebration of dahihandi Sakal
मुंबई

Mumbai News : दहिहंडी उत्सवानिमित्त वाहतूकीत झाले महत्वाचे बदल

शर्मिला वाळुंज

Mumbai News : डोंबिवली शहरात शिवसेना, भाजप व मनसेच्या वतीने भव्य स्वरूपात दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूकीचा प्रश्न उद्भवू नये म्हणून शहर वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूकीत बदल करण्यात आले आहे.

डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौक व पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्ता या मार्गावरील वाहतूक 6 सप्टेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 7 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याची अधिसूचना डोंबिवली वाहतूक विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौकात भारतीय जनता पार्टीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावतीने दहिहंडी उत्सव भरविण्यात येतो. तर पश्चिमेतील पंडीत दिनदयाळ रस्त्यावर सम्राट चौक येथे शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांच्यावतीने दहिहंडी उत्सव आयोजित केला जातो.

हे दोन्ही मार्ग वर्दळीचे केंद्रबिंदू असल्याने या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या मार्गावरील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.

पूर्वेतील बाजी प्रभू चौक येथील वाहतूक बुधवारी रात्री 12 पासून गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहील. फडके रोड वरुन बाजी प्रभू चौककडे येणारी वाहतूक सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बाजी प्रभू चौकात पूर्णपणे बंद असेल. ही वाहने अंबिका हॉटेल जवळून वळण घेऊन फत्तेह अली रोडने मार्गस्थ होतील.

तर पश्चिमेतील डोंबिवली रेल्वे स्टेशनकडून पंडीत दिनदयाळ रोडने सम्राट चौककडे जाणारी वाहने गणपती मंदिर या ठिकाणी पूर्णपणे बंद राहील. ही वाहने गणपती मंदिराजवळून डावीकडे वळण घेऊन जी.एन. गॅरेज, येरोला सोसायटी मार्गे सम्राट चौक कडे जातील.

ही वाहने गणपती मंदिराजवळून डावीकडे वळण घेऊन जी.एन. गॅरेज, येरोला सोसायटी मार्गे सम्राट चौक कडे जातील. दिनदयाळ रोडवरुन ठाकूरवाडी, रेतीबंदर चौक येथून सम्राट चौक मार्गे रेल्वे स्टेशनला जाणारी वाहने व्यंकटेश सोसायटी येथे पूर्ण बंद असतील. ही वाहने डावीकडे वळण घेऊन नाना शंकर शेठ रोड मार्गे प्रवास करतील असे वाहतूक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT