Ajit Pawar Almatti Dam esakal
मुंबई

Kolhapur Flood : आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळं कोल्हापुरात पुराची समस्या; पूर टाळण्याबाबत अजितदादांनी दिले 'हे' निर्देश

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्यामुळे धरणांमधील पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करावे.

सकाळ डिजिटल टीम

बनावट बियाणे विक्रेते सापडले तर त्यांच्यावर कडक कारवाई करा,’’ असे निर्देश पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले.

मुंबई : ‘‘आलमट्टी धरणाच्या (Almatti Dam) पाण्यामुळे कोल्हापूर शहरात पुराची (Kolhapur Flood) समस्या येऊ नये, यासाठी आतापासून नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी सर्व विभागीय आयुक्तांना दिले. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची दक्षता घ्यावी, असा सूचनाही त्यांनी दिली.

अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात राज्यातील पाऊसमान, खते, बी-बियाणे पुरवठा, पीक कर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणांतील पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धता याबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. कोल्हापूरच्या संभाव्य पूरस्थितीचा उल्लेख करून त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना या बैठकीत केल्या.

‘‘हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्यामुळे धरणांमधील पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करावे. योग्य वेळी पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावे. पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन शहरे, गावांत पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच मेडिगट्टा, गोसीखुर्द धरणाबाबतही दक्ष राहून गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही याबाबत काळजी घ्यावी,’’ असे निर्देशही त्यांनी दिले.

बनावट बियाणे विक्रेते सापडले तर त्यांच्यावर कडक कारवाई करा,’’ असे निर्देश पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची दक्षता घ्यावी, असा सूचनाही त्यांनी दिली. बैठकीला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक लहूराज माळी, कृषी विभागाचे उपसचिव चांदवले उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडे तसेच नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोकण विभागाचे उपायुक्त यांच्यासह कृषी सहसंचालक रावसाहेब भाबडे यांनी कार्यवाहीची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीस्ता नदी प्रकल्पावरून भारत-चीनमध्ये नवा संघर्ष! चिकन नेकजवळ हालचाली वाढल्या; भारताच्या चिंतेवर ड्रॅगनचं मोठं प्रत्युत्तर

Heavy Rain in Pune Ghats: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी ; भिरा येथे विक्रमी ४०७ मिमी पावसाची नोंद

GBS Virus: कोरोना महामारीनंतर 'जीबीएस'चं संकट, पनवेलमध्ये दोन रुग्ण पॉसिटीव्ह; नेमका आजार काय?

Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी..

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात ५,२२३ नव्या पदांची मेगाभरती! अनेक जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये जागा भरणार; कुठे आणि कधी?

SCROLL FOR NEXT