मुंबई

कोपरी पुलाबाबत गृहमंत्र्यांचा महत्वाचा आदेश 

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : कोपरी पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम मे, २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (ता.२४) रेल्वे आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले.

त्यासाठी मनुष्यबळ आणि कामाचा वेग वाढवा, रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करा, असे बजावण्यात आले आहे. या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांची रुंदी वाढवा, मुंबई महापालिकेच्या बंद जकात नाक्‍याच्या जागेतून पर्यायी मार्गिका सुरू करा आणि शक्‍य असेल तिथे मुख्य रस्त्यांवरील दुभाजक हटवून रस्याची रुंदी वाढवा, अशा उपाययोजनाही शिंदे यांनी या वेळी सुचविल्या आहेत.   

नव्याने उभारण्यात येणाऱ्या कोपरी पुलाच्या पायलिंगचे ९० टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. पुलाच्या स्लीप गर्डरचे काम पालघर येथे सुरू आहे. फेब्रुवारी महिनाअखेर पायलिंगचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पुढील अडीच महिन्यांत गर्डर्सचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर अस्तित्वातल्या जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूंना नव्याने उभारल्या जाणाऱ्या या पुलांवरून वाहतूक सुरू करणे शक्‍य होणार आहे. त्यानंतर जुना पूल पाडून त्या ठिकाणी मे, २०२१ अखेरपर्यत नव्या पुलाची उभारणी केली जाईल. त्यानंतर या मार्गावरून आठपदरी वाहतूक सुरू होईल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.   

ही बातमी वाचा ः  भिवंडीतील अंजूरफाटा चौक होणार कोंडीमुक्त
हे काम करताना वाहतूक पोलिसांकडून आवश्‍यक परवानग्यांबाबत सहकार्य मिळाले तर कामाचा वेग वाढवता येईल, असे मत रेल्वे आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी या वेळी मांडले. त्यानंतर शिंदे यांनी ठाण्याचे पोलिस उपायुक्त (वाहतूक) अमित काळे यांना फोन करून आवश्‍यक असलेल्या परवानग्या तातडीने देण्याचे निर्देश 
दिले आहेत. 


मुंबई महापालिकेच्या बंद जकात नाक्‍याची काही जागा मिळाली तर तिथून पर्यायी मार्गिका सुरू करणे शक्‍य आहे. शिंदे यांनी त्याबाबतच्या सूचना दिल्यानंतर ही जागा तातडीने उपलब्ध करून दिली जाईल, असे प्रवीण दराडे यांनी स्पष्ट केले. या कामाच्या प्रगतीचा साप्ताहिक अहवाल सादर करण्याच्याही सूचना रेल्वे आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


सर्वंकष आराखड्यासाठी बैठका
भविष्यात या ठिकाणी नवे रेल्वे स्टेशन उभारले जाणार आहे. त्यामुळे तीनहात नाक्‍यावरील वाहतुकीची वर्दळ वाढेल. ही वाहतूक सुरळीत पद्धतीने व्हावी, यासाठी ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग व पर्यायी रस्त्यांचे जाळे निर्माण करणे क्रमप्राप्त आहे. त्याची रूपरेषा ठरविण्यासाठी आणि संभाव्य अडथळ्यांवर कशी मात करता येईल, यासाठी एमएमआरडीएसह मुंबई आणि ठाणे महापालिका अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठका घेऊन सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानुसार जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या बैठकांना सुरुवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Controversy : मग कोरमचा कायदाच का रद्द करत नाही? सतेज पाटील यांचा CM फडणवीसांना प्रतिप्रश्न

Palghar Talasari Earthquake Tremors : पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू; तलासरीत २.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा धक्का, ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा भूकंपाने हादरला परिसर

Ashti Tiger Attack Farmer Death Beed News : आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; देवळाली परिसरासह तालुक्यात प्रचंड घबराट, सकाळी १० ते ५ या वेळेतच शेतात जाण्याचे वनविभागाचे आवाहन

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT