Imtiaz Jaleel Imtiaz Jalil)
मुंबई

‘मुंबई लो में आ गया’ : खासदार इम्तियाज जलील

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ‘मुंबई लो में आ गया’, ‘मुंबई लो में आ गया’ असे म्हणत खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणत होते ‘सरकार आमची आहे, आम्ही काहीही करू शकतो, आणि मी म्हणत होते जनता माझी आहे मी काहीही करू शकतो’ असे म्हणत इम्तियाज जलील यांनी मुंबईत पोहोचल्याच्या आनंदात म्हटले.

एमआयएमचा मोर्चा मुंबईच्या चांदीवलीपर्यंत पोहोचून नये यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, २२५ गाड्यांसह निघालेला ताफा मुंबईत दाखल झाला. सकाळी सहा वाजता आम्ही तिरंगा रॅलीली सुरुवात केली तेव्हा मुंबईत पोहोचने कठीण जाईल असे म्हटले होते. सुरुवातीला औरंगबादच्या बाहेर निघणे कठीण जाईल, असे म्हटले. मात्र, आम्ही निघालो.

यानंतर अहमदनगरच्या बाहेर जाऊ शकत नाही, असे म्हटले. नंतर पुण्याच्या बाहेर निघणे कठीण होईल, असे सांगितले, तरीही आम्ही पोहोचलो. सर्व अडथळे पार करून आम्ही मुंबईत दाखल झालो. आम्हाला रस्त्याने येऊ नसते दिले तर ट्रेनच्या डब्यावर बसून आम्ही आलो असतो, असेही खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

तब्बल १३ तासांचा प्रवास करून आम्ही मुंबईत दाखल झालो. पोलिसांनी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांची काहीही चूक नव्हती. कारण, ते आपलं काम करत होते आणि आम्ही आमचे काम करीत होते, असेही ते म्हणाले. सर्व अडथळे पार करून आम्ही मुंबईत दाखल झालो आणि सभाही घेत आहो, असेही ते म्हणाले.

सरकार किती घाबरते हे माल रात्री समजले

देशात मुस्लिमांची संख्या मोठी आहे. यामुळे देशाची मुस्लिमांशिवाय प्रगती नाही, हे सरकारने समजून घेतले पाहिजे. आम्ही सभा घेतली नाही पाहिजे, असा नोटीस सरकार रात्री १२ वाजता पाठवते. यावरून सरकार किती घाबरते हे दिसून येते. नोटीसमध्ये ओमिक्रॉनचे कारण पुढे करून सरकार ११ आणि १२ डिसेंबरला सभा घेता येणार नाही, असे सांगते. आम्ही दोन दिवस मुंबईत आहो तर ओमिक्रॉन नंतर नाही, असेही खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच धडक, घिरट्या घालत अचानक जमिनीवर कोसळले; घटनेचा धक्कादायक VIDEO समोर

Aadhaar Updates : UIDAI च्या नवीन सूचना! आधार कार्ड स्कॅमपासून वाचण्यासाठी करा ही 5 कामे

Panhala Forest Ban : पन्हाळ्यातील वनक्षेत्रात पर्यटकांना नो-एन्ट्री! 'या' तारखेपर्यंत वन विभागाकडून नाकाबंदी, काय आहे कारण?

Latest Marathi News Live Update : नागपुरमध्ये भाजप उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार

Jalgaon Municipal Election : जळगावात युतीची गाडी घसरली? जागावाटपावरून खडाजंगी, गुलाबराव पाटील तावातावात बाहेर!

SCROLL FOR NEXT