teachers 
मुंबई

BMC मध्ये मराठी माध्यमातून शिकलेल्या शिक्षकांना नाकारली जातेय नोकरी

दोन आठवड्यांत महापालिकेने उत्तर न दिल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपाने दिला आहे.

कृष्ण जोशी - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: महापालिकेत (bmc) होणाऱ्या शिक्षकभरतीत (teachers recruitment) फक्त मराठी माध्यमातून (Marathi medium) शिकलेल्या शिक्षकांना नाकारले जात असून याबाबत दोन आठवड्यांत महापालिकेने उत्तर न दिल्यास आंदोलन (protest) केले जाईल, असा इशारा महापालिकेतील भाजपचे शिक्षण समिती सदस्य प्रतीक कर्पे यांनी दिला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकामार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीत केवळ मराठी माध्यमातून शिक्षण झाल्याने शिक्षकांना नाकारण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांनी मुंबई महानगरपालिकेला 21 जून रोजी पत्र लिहिले होते. मात्र एक महिना उलटूनही महापालिकेकडून उत्तर मिळाले नाही. त्यामुळे येत्या 15 दिवसांत महापालिकेकडून उत्तर न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सुमारे दीडशे मराठी शिक्षकांवर हा अन्याय झाला आहे. त्यांनाही संधी देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीत मार्च महिन्यात मांडला होता. चार महिन्यांनंतरही या प्रस्तावावर महापालिकेने कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. याविषयी जाब विचारला असता संबंधित विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले जाते.

तर राज्य सरकारला विचारल्यावर महापालिकेला प्रस्ताव दिल्याचे राज्य सरकार सांगते. हे ढकलाढकलीचे राजकारण असून समाधानकारक उत्तर न दिल्यास आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. एरवी मराठी भाषेचा कैवार घेण्याची भाषा करणारा सत्ताधारी पक्ष या विषयावर मुग गिळून का बसले आहेत, असाही टोला कर्पे यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT