rape case  file photo
मुंबई

डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला बापाने पाजली दारू

एका दिवशी बेडरूम मधून मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने आईने विचारले असता बापाने दरवाजा न उघडता आईला झोपण्यास सांगितले.

शर्मिला वाळूंज

डोंबिवली: दारूच्या नशेत बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना डोंबिवली (Dombivali) पश्चिमेत उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत बापाने 9 वर्षीय मुलीवर दोनदा लैंगिक अत्याचार केला आहे. इतकेच नव्हे तर 9 वर्षीय मुलीसोबत 8 महिन्याच्या मुलीला दारू पाजण्याचे (Alcohol) दुष्कृत्य देखील त्याने केले आहे. आरोपीच्या पत्नीने याप्रकरणी विष्णूनगर पोलीस (police) ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी लगेच आरोपी बापास अटक (Arrest) केली.

डोंबिवली पश्चिमेत विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बापानेच आपल्या पोटच्या मुलींना दारू पाजून एका मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ऑक्टोबर महिन्यात पत्नी गावी गेली असता बापाने मुलीला अंघोळ घालण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. आई गावावरून आल्यावर 9 वर्षीय मुलीने आईला सर्व प्रकार सांगितला.

मात्र आईने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र मुलगी सतत रडत आहे हे पाहून आईने मुलीला विश्वासात घेत नक्की काय घडले विचारले असता मुलीने सर्व हकीकत सांगितली. यावर आईने बापाला जाब देखील विचारला मात्र ती लहान आहे असे सांगून त्याने आईला गप्प केले. ऑक्टोबर महिन्यातच एका दिवशी बेडरूम मधून मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने आईने विचारले असता बापाने दरवाजा न उघडता आईला झोपण्यास सांगितले.

सकाळी आईने मुलीला रात्री काय झाले का रडत होती विचारले असता मुलीने वडिलांनी काय केलं ते सांगितलं. त्यानंतरही बापाने 9 वर्षीय मुलीसोबतच 8 महिन्याच्या मुलीला दारू पाजणे, पत्नीला मारहाण असे प्रकार सुरू ठेवल्याने अखेर आईने शुक्रवारी विष्णू नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी 49 वर्षीय आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उप निरीक्षक मोहिनी कपिले यांनी महिलेची तक्रार नोंदवून घेत आरोपीस तत्काळ अटक केली आहे. शनिवारी आरोपीस कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती कपिले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : इशान किशनने पाकड्यांना टप्प्यात घेऊन ठोकले; अभिषेक शून्यावर गेला म्हणून नाचले होते, रोहितचा जल्लोष

Kalamb Crime : मित्रानी दारू पाजून खून केल्याची घटना उघड; येरमाळा पोलिसांनी पाच संशयितना केली अटक

Latest Marathi News Live Update : बदलापूरमध्ये चोरटयांनी एकाच रात्रीत सात दुकानं फोडली

VIDEO : भाईचा नाद करायचा नाय...रोहित शर्मा टीम इंडियाला चिअर करण्यासाठी चार्टर्ड प्लेनने कोलंबोत दाखल

Vadigodri News : वडीगोद्रीत स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न, चोरीचे साहित्य पोलीसाकडुन जप्त

SCROLL FOR NEXT