rape case  File photo
मुंबई

डोंबिवलीत १५ वर्षीय मुलीवर २९ जणांनी केला बलात्कार

22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली: मुबंई साकीनाका (Sakinaka rape case) येथील घटनेनंतर डोंबिवलीत (dombivali) 15 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराने एकच खळबळ उडाली आहे. तब्बल 29 जणांनी तिच्यावर गेल्या 8 महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार (rape) केल्याचा आरोप पिडीत मुलीने केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल होताच मानपाडा पोलिसांच्या (Manpada police) चार पथकांनी 23 आरोपींना अटक करत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती गुरुवारी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

डोंबिवली (dombivali) सारख्या सुशिक्षित शहरात एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार (rape) झाल्याची घटना घडली आणि एकच खळबळ उडाली. भोपर गावात (Bhopar village) राहणाऱ्या पीडित मुलीवर दोन दिवसापूर्वी बलात्कार झाला. तिला त्रास होऊ लागल्याने तिने याविषयी आईला सांगताच आईने घरच्यांना कल्पना देत मानपाडा पोलीस (manpada police) ठाण्यात धाव घेतली. बुधवारी रात्री 29 जणांविरोधात तक्रार दाखल केली. यामध्ये 29 जानेवारी ते 22 सप्टेंबर 2021 या कालावधीत डोंबिवली, बदलापूर, मुरबाड व रबाळे या परिसरात आरोपींनी बळजबरीने तिच्यावर बलात्कार करीत त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले.

काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर नंतर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचे म्हटले. तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी तपास सुरु करत 4 पोलीस पथके स्थापन करीत काही तासात मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे 23 जणांना अटक केली.

यातील 2 जण अल्पवयीन मुले आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले या करीत आहेत. पोलिसांनी आरोपींची नावे अद्याप उघड केली नसल्याने हा संशय अधिक बळावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT