Corona In Children 
मुंबई

महाराष्ट्रात १ मार्च ते ४ एप्रिलमध्ये ६० हजारपेक्षा जास्त मुले कोरोनाबाधित

पाच वर्षाखालील ९ हजारपेक्षा जास्त मुलांना कोरोनाचा संसर्ग

दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्रात (maharashtra) 1 मार्च ते 4 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 60,684 लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह (childrens covid positive)आढळून आली. यातील सुमारे 9,882 मुले 5 वर्षांखालील आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येच्या 20 टक्के रुग्णसंख्या ही लहान मुलांची आहे. (In maharashtra From 1 st march to 4 april more than 60 thousand childrens covid positive)

कोव्हिड संसर्गाच्या घटनांची शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांसह लहान मुलांच्या बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता ही वर्तवण्यात येत असून कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते असा इशारा बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे. मुलांमधील वाढता संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे बालरोग तज्ञांचे म्हणणे आहे.

'इंडियन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रीक्स'नेही लहान मुलांमधील वाढत्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली असून केंद्रीय आरोग्य खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार देशभरातील 5 राज्यांमध्ये एकूण 79 हजार 688 मुले कोरोनाबाधित झाली आहेत. छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली मध्ये कोरोनाबाधित लहान मुलांचा आकडा हा अनुक्रमे 5940, 7327, 3004 आणि 2733 इतका आहे. हरियाणा सरकारच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 11 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान 11 हजार 344 कोरोनाबाधित लहान मुले आढळून आली आहेत.

बहुतेक मुलांमध्ये सौम्य तसेच गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून आली असून अशा मुलांवर देखील यशस्वीरित्या उपचार करण्यात येत आहेत. संसर्ग टाळण्याकरिता 6 महिन्यांपर्यंतच्या नवजात बाळाला केवळ स्तनपान दिले गेले पाहिजे तसेच पालकांनी मुलांच्या लसीकणाचे वेळापत्रक चूकवू नये असे खारघर येथील मदरहुड हॉस्पीटलचे बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ सुरेश बिराजदार यांनी सांगितले.

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिक लहान मुलांना संसर्ग आणि त्रास होत आहे. कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुस-या लाटेत ताप, अतिसार, सर्दी आणि खोकला यांसारखी लक्षणे दिसून आली. घरातल्या प्रौढ व्यक्तींमध्ये तीव्र लक्षणे असल्याने, मुलांना देखील त्याचा संसर्ग होऊ शकतो. जरी लहान मुलांना जास्त त्रास होत नसला तरीदेखील ते संसर्गाचे वाहक ठरू शकतात.

लहान मुलांची अशी घ्या काळजी

समोरच्या व्यक्तीशी बोलताना कमीतकमी 3 फूट अंतर राखावे. विशेषत: आजारी असलेल्यांनी इतर व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळावे असे केल्याने मुलांना संसर्ग होण्यापासून रोखता येईल.

·अस्वच्छ हातांनी आपले डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका, जर आपण वारंवार स्पर्श केला तर विषाणु संसर्गाचा धोका अधिक वाढतो.

.मुलांना ताप, खोकला तसेच श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांशी सल्लामसलत करुन त्यातील लक्षणांविषयी माहिती द्या. वेळीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या व उपचारास विलंब करू नका.

·आपल्या मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक चूकवू नका. जर एखादा डोस घण्यात विलंब होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रलंबित डोस लवकरात लवकर घेण्यात यावा.

.निरोगी आतडे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. दही सारख्या पदार्थात प्रोबायोटिक्स भरपूर असतात जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. मुलांना सतत एकाच जागी बसवून न ठेवता त्यांच्या शारीरीक हालचाली वाढवून त्यांना सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहित करा आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्याविषयी मुलांना सूचना द्या.

·सॅनिटाझर्सचा वापर करणे किंवा साबणाने स्व्छ हात धुणे अधिक गरजेचे आहे. ज्यामुळे अस्वच्छ हातांमधून पसरणा-या विषाणूचा नाश करणे शक्य होते.

·खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल अथवा टिश्यु पेपर धरावा. पुन्हा पुन्हा तोच टिश्यु पेपर न वापरता एकदा वापर झाल्यानंतर त्वरीत तो कचराकुंडीत टाकून द्यावा.

·मुलांना कच्चे अथवा अर्धवट शिजविलेल्या मांसाचे सेवन करणे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT