मुंबई

तुरुंगातून सुटल्यानंतर 'भाई'ची जंगी मिरवणूक निघाली, पण...

सुरज सावंत

मुंबई: समाजात गुन्हेगारीचे (crime) उदात्तीकरण होत असल्याच्या काही घटना समोर येत आहेत. मध्यंतरी तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची (gaja marne) मिरवणूक काढण्यात आली होती. गाड्यांचा मोठा ताफाच या मिरवणुकीमध्ये होता. सोशल मीडियावर (social media) याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलिसांना कारवाई (police action) करावी लागली. आता मुंबईतही एक असाच प्रकार समोर आला आहे. (In mumbai celebration after criminal come out of jail police file another complaint)

२५ गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका आरोपीची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली. शहाबुद्दीन मुन्वरअली इद्रिसी असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर या शहाबुद्दीनची त्याच्या समर्थकांनी मिरवणूक काढली. या मिरवणुकीचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या स्वागत मिरवणुकी दरम्यान कोरोना नियमांचे सर्रास उल्लघंन करण्यात आलं.

हार-तुरे घालून शहाबुद्दीनच स्वागत करण्यात आलं. शहाबुद्दीन मुन्वरअली इद्रिसी २०१७ पासून एका गंभीर गुन्ह्यात फरार होता. मागच्यावर्षी शिवाजी नगर पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडलं होतं. नुकताच त्याला जामीन मिळाल्यानंतर तो त्याच्या परिसरात पोहचला असता, त्या परिसरातील काही जणांनी त्याचे जंगी स्वागत करण्यासाठी मिरवणूक काढली.

या आरोपीला फुलांच्या माळा घालून त्याला खांद्यावर घेऊन आरोपींसोबत उपस्थितांनी फोटो काढले. शहाबुद्दीनवर २५ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्यात जिवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी आणि मारामारीच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या घटनेनंतर शहाबुद्दीनवर जमावबंदी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस लवकरच त्याच्यावर तडीपारची कारवाई करण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT