मुंबई

बलात्काराचा आरोपी हातात बेड्या असताना मुंबई पोलिसांच्या तावडीतून पळाला

कांदिवलीमध्ये घडली घटना

दीनानाथ परब

मुंबई: बलात्काराच्या (rape accused) गंभीर गुन्ह्याची नोंद असलेला आरोपी मुंबई पोलिसांच्या (Mumbai police) तावडीतून निसटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अविनाश हरीशचंद यादव (२१) असे आरोपीचे नाव आहे. अविनाशला कोविड-१९ (covid-19) चाचणीसाठी कांदिवलीच्या (kandivali) शताब्दी रुग्णालयात नेण्यात येत असताना ही घटना घडली. अविनाश यादव पळाला त्यावेळी त्याच्या हातात बेडया होत्या. त्याने कॉन्स्टेबलला ढकलून पळ काढला. (In mumbai kandivali area handcuff accused fled police custody)

अविनाशला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली २६ जूनला अटक केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस चालकाने व्हॅन थांबवली व दुकानातून पाणी आणण्यासाठी म्हणून ते खाली उतरले, तीच संधी साधून आरोपीने दुसऱ्या कॉन्स्टेबलला ढकलून पळ काढला. कांदिवली एमजी रोडच्या दिशेने आरोपीने पळ काढला.

पोलिसांनी आरोपींला शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळाले नाही. आम्ही नवीन गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अविनाशचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही घरातून पळून गेले होते. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी अविनाश विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT