मुंबई

मुंबई लोकलमध्ये चोरांची पब्लिक धुलाई, व्हिडीओ व्हायरल

मुलुंड स्थानकात ही घटना घडली.

सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: मुंबई लोकलमध्ये (Mumbai local) नेहमीच चोरीच्या (theft cases) घटना घडत असतात. अनेकदा चोरटे आपलं काम करुन सहज निसटतात. पण अपवादात्मक परिस्थितीत एखादा चोर पकडला गेला, तर त्याला पोलिसांच्या (police) स्वाधीन करण्याआधी प्रवाशांकडूनच धडा शिकवला जातो. मुंबई लोकल मध्ये अशाच एका चोरट्याला प्रवाशांनी (commuters) बेदम चोप दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

मुलुंड स्थानकात ही घटना घडली. मुलुंड ते मुंब्रा दरम्यान धावत्या लोकल मध्ये या चोराला प्रवाशांनी मारहाण केली. हे दोघे चोरटे पर्स आणि मोबाईल चोरत असल्याचा प्रवाशांना संशय आला. यातील एका चोराने प्रवाशाची पर्स चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पकडला गेला. त्यामुळे त्याला आणि त्याच्या साथीदाराला पळून जाताना प्रवाशांनी पकडले आणि थेट घेरले.

या दोन्ही चोरांना सीटच्या मध्ये ठेऊन त्यांना सर्वांनी चोप दिला. ही घटना मुलुंड वरून संध्याकाळी 7.44 च्या कल्याण लोकल मध्ये घडली. अखेर मुंब्रा स्टेशनला रेल्वे पोलीस डब्यात चढले आणि त्यांनी या दोघांना ताब्यात घेतलं. तोपर्यंत प्रवाशांनी त्यांची पब्लिक धुलाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT