मुंबई

मुंबईत मनसेचं धाकुमाकूम, थर रचून फोडल्या दहीहंड्या

ठाकरे सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर घातलीय बंदी.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्र सरकारने (maharashtra govt) दहीहंडी उत्सव (dahi handi) साजरा करण्यावर बंदी घातली आहे. कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठाकरे सरकारचा (thackeray govt) हा निर्णय मान्य नसून त्यांनी दहीहंडी उत्सव साजरा करणारच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. कालपासूनच मनसेचे नेते दहीहंडीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

मनसेने दहीहंडीवर बंदी घालण्याचा विषय हिंदू सणांशी जोडला आहे. काल रात्रीपासूनच मुंबईत ठिकठिकाणी मनसे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली थर रचून दहीहंड्या फोडण्यात येत आहेत. मनसेकडून साजऱ्या होणाऱ्या या दहीहंडी उत्सवाचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले आहेत. लोक एकत्र आल्यास कोरोनाचा प्रसार होईल, या भीतीपोटी राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातलीय.

काल ठाण्यातून मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी दहीहंडीसाठी मंडप बांधण्याचं काम बंद पाडलं होतं. एकीकडे भर गर्दीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो ट्रेनचे होणारे उद्घाटन, भर गर्दीत होणाऱ्या राजकीय सभा, आणि विरोधी पक्षावर तुडुंब गर्दीत हल्लाबोल करणारे शिवसैनिक या ठिकाणी कोरोनाचे कोणतेही निर्बंध व कायदे लागू नाही. परंतु गणेशोत्सव व दही हंडी सारखे मराठमोळे हिंदू सण साजरे करण्यास मात्र अगदी कडक निर्बंध, अशी मनसेची भूमिका आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दादरमध्ये पहाटेच्या सुमारास दहीहंडी फोडली. दहीहंडी नंतर महाविकासआघाडीचा उल्लेख तालिबानीशी करत, सरकारचा निषेध संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संजय नाईक यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

Cancer Care Support: डॉक्टरांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो; अशा वेळी 'केअरगिव्हर' म्हणून तुमची जबाबदारी काय?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये टेम्पो दुचाकीवर आदळून एकाचा मृत्यू

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

SCROLL FOR NEXT