मुंबई
मुंबई sakal
मुंबई

मुंबईत रुग्ण वाढले, मृत्यू कमी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत रुग्ण काहीसे वाढले असून आज 270 नवीन रुग्ण सापडले. मृत्यूचा आकडा मात्र पुन्हा एकदा 1 पर्यंत खाली आला. रविवारी देखील केवळ एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली होती. रुग्णादुपटीचा कालावधी ही1983 वरून 1958 पर्यंत खाली आला. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,41,661 इतकी झाली आहे. आज 279 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7,20,478 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत आज 28,740 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 89,76,072 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी काहीसा कमी होऊन 1958 दिवसांपर्यंत खाली आला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.4 % पर्यंत खाली आला आहे. नव्या रुग्णांपेक्षा आज बरे होणारे रुग्ण अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 % पर्यंत गेले आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 2,791 हजारांवर आला आहे. मुंबईत आज दिवसभरात 1 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 952 इतका झाला आहे.

आज मृत झालेल्या रुग्णाला दीर्घकालीन आजार होता. मृत्यू झालेला रुग्ण पुरुष असून त्याचे वय 60 वर्षा वरील होते. कोरोना नियंत्रणात आल्याने मुंबईत सक्रिय कंटेंटमेंट झोन ची संख्या 0 आहे. सीलबंद इमारतींची संख्या ही कमी होऊन 22 पर्यंत खाली आली आहे. गेल्या 19 तासांत 881 अति जोखमीचे संपर्क समोर आले असून 754 जणांना कोविड काळजी केंद्र 1 मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT