Mumbai University Sakal
मुंबई

मुंबई विद्यापीठात मराठीतून मिळणार इंजिनिअरिंगेच शिक्षण

गीतारहस्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरु होणार.

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई: केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाची (new education policy) विद्यापीठांमध्ये (univercity) अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यापीठात आता या धोरणानुसार शैक्षणिक रचनेत (education system) अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. यामध्ये विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांना विशेष ओळख प्राप्त व्हावी आणि एका छत्राखाली यावे यासाठी ‘स्कूल संकल्पना’ राबविण्यात येणार असून यासाठीच हा महत्त्वाचा निर्णय विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. (In mumbai univercity students get engineering education in marathi language)

नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात आता मराठीतून इंजिनीअरिगचे शिक्षण देण्यास परवानगी देण्यात आली असल्याने येत्या काळात राज्यातील इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाचे स्वरूपच बदलले जाणार आहे. मुंबई विद्यापीठात या शैक्षणिक वर्षांपासून विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात होत आहे. विद्यापीठ पातळीवर विविध विषयांना एका छत्राखाली आणण्यासाठी स्कूल संकल्पना राबवली जाणार आहे. विविध विद्याशाखाअंतर्गत असणाऱ्या विषयांची ओळख आणि ते विषय शिकण्याची संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे.

याअंतर्गत स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजेस, स्कूल ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस आणि स्कूल ऑफ पर्फॉर्मिंग आर्ट्स अशा विविध स्कूल्सची स्थापना करण्यासाठी मंगळवारी पार पडलेल्या विद्वत परिषदेमध्ये मंजूरी देण्यात आली. विद्यापीठात नव्याने सुरू करण्यात आलेल्या सागरी अध्ययन केंद्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अध्ययन केंद्र या दोन्ही नवीन केंद्राच्या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे.

सागरी अध्ययन केंद्रामार्फत एमए मेरिटाइम स्टडीज, एमकॉम मेरिटाइम स्टडीज आणि एमएस्सी मेरिटाइम स्टडीज यासह पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात येणार आहे. तर आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अध्ययन केंद्रामार्फत एमए आणि पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. लोकमान्य टिळक अध्यासन केंद्रामार्फत या शैक्षणिक वर्षापासून पत्रकारीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम, खगोलशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम, गीतारहस्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम या अभ्यासक्रमांना मंजूरी देण्यात आली आहे. भौतिकशास्त्र विभागाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘व्हर्च्युअल सेंटर ऑफ एक्सलेंस इन थेरॉटिकल अँड कम्प्युटेशनल फिजिक्स’ या केंद्राच्या स्थापनेस मंजूरी मिळाली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सलंग्नित महाविद्यालयांमध्ये लवकरच मराठीतून इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक गरजा लक्षात घेऊन इंजिनिअरींगच्या आठ शाखांमध्ये उद्योन्मुख नवीन विषयांच्या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. ज्यामध्ये आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड डेटा सायन्स, आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड मशिन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा इंजिनीअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (डेटा सायन्स), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड मशिन लर्निंग), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी इन्क्ल्युडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी) अशा अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.

इतर महत्त्वाचे निर्णय

- विद्यार्थ्यांमधील कौशल्यवाढीसाठी तथा विशेष क्षेत्रात प्राविण्य संपादीत करण्यासाठी विद्यापीठात पहिल्यांदाच संशोधनात्मक क्षेत्रीय केस स्टडीजचा समावेश करण्यात येणार आहे. वाणिज्य विद्याशाखेअंतर्गत बीएमएस, बीएएफ आणि बीबीआई या अभ्यासक्रमांच्या चौथ्या सत्रात क्षेत्रीय केस स्टडीज सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ३० तास आणि २ क्रेडिट बहाल केले जाणार आहेत. तसेच विज्ञान शाखेअंतर्गत वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांसाठी आणि मानव्यविद्याशाखांतर्गत अर्थशास्त्र, भूगोल, समाजशास्त्र विषयांसाठीही क्षेत्रीय केस स्टडीज सुरू करण्यात येणार आहे.

- विद्यार्थ्यांमध्ये एनसीसी बाबत जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांचा राष्ट्रसेवेमध्ये सहभाग वाढावा यासाठी आजमीतीस ज्या-ज्या कॉलेजांत एनसीसी युनिट आहेत त्या-त्या कॉलेजांत एनसीसी हा वैकल्पिक विषय म्हणून सुरू करण्यासाठीही मंजूरी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT