लॉकडाउन File photo
मुंबई

भांडूप, विक्रोळीत अत्यावश्यक दुकानांबद्दलही महत्त्वाचा निर्णय

निर्बंध अधिक कठोर झाले

समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: भांडूप,कांजूरमार्ग, पवई विक्रोळी या भागातील औषधाची दुकाने वगळता सर्व अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने, भाजी पळ विक्रेत्यांना दुपारी १२ नंतर व्यवसाय करण्यास बंदी करण्यात आली आहे, तसे परीपत्रक एच प्रभागाने प्रसिध्द केले आहे.

राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार अत्यावश्‍यक सेवेतील व्यवसाय सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजे पर्यंत करता येणार आहे. तसेच अत्यावश्यक कारणाव्यतिरीक्त सामान्य नागरीकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी आहे. मात्र,तरीही बाजारांमध्ये गर्दी दिसून येत आहे. यावर राज्य सरकारसह महापौर किशोरी पेडणेकर यांनीही निर्बंध अधिक कठोर करण्याची गरज व्यक्त केली आहे.

एस प्रभागाचे सहाय्यक आयुक्त विभास आचरेकर यांनी या प्रभागातील बाजारांच्या वेळेचे नियोजन केले आहे. यात, औषधांची दुकाने वगळता इतर सर्व अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने दुपारी १२ वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहे. त्याच बरोबर मेट्रो,डी मार्ट असे डिपार्टमेंट स्टोअर्सही या वेळेनंतर बंद करण्याचे निर्देश आचरेकर यांनी दिले आहेत. यात फक्त हॉटेल्सना पुर्वीप्रमाणे होम डिलेव्हरीची परवानगी आहे.

यापुर्वी घाटकोपर एन विभागाच्या हद्दीत सकाळी 11 ते 4 या वेळेत सर्व बाजार बंद ठेवण्यात येत होता. बाजारांमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. एस प्रभागात आता पर्यंत 16 हजार 150 रुग्ण आढळले आहेत तर सध्या 3 हजार 678 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT