मुंबई

अंधेरी सब वे 'या' वेळेत वाहतुकीसाठी राहणार बंद

कुठल्या वेळेत, किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत राहणार बंद ?

सुरज सावंत

मुंबई: मुंबई पोलिसांनी अंधेरी सब वे (Andheri sub way) बद्दल अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात रात्रीच्यावेळी वाहतुकीसाठी अंधेरी सब वे बंद राहणार आहे. पश्चिम उपनगरचे पोलीस उप आयुक्त सोमनाथ घार्गे यांनी त्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर करुन रात्रीच्या वेळी अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. (In rainy season Andheri sub way in night time will close for all type of traffic movements)

पावसाळ्यात अंधेरी सब वे मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकदा वाहनचालक या ठिकाणी अडकून पडतात. त्यावेळी गाडीत पाणी जाऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच मुंबई पोलिसांनी अंधेरी सब वे तून रात्रीच्यावेळी प्रवास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे उ्डडाण पूल, मिलन सब वे, गोपगोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाचा वापर पर्यायी वाहतूकीसाठी करण्याच्या सूचना वाहतूक विभागाकडून करण्यात आली आहे. आज रात्रीपासून ते ३० सप्टेंबरपर्यंत रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वेळापत्रकात बदल! तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेचा समावेश; जाणून घ्या तारखा

Pune Nashik Railway Protest: पुणे–मंचर–नाशिक रेल्वेसाठी क्रांतीदिनी रास्ता रोको; अहिल्यानगर मार्गाच्या हालचालीविरोधात तीव्र संताप

Marathi News Live Updates : दिल्ली येथे २०९ किलो वजन असलेल्या 'सुपर-सुपर ओबेसिटी'च्या रुग्णावर यशस्वी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया

Nimgaon Mhalungi burglary: निमगाव म्हाळुंगीतील रणदिवे वस्तीमध्ये दिवसा घरफोडी; १० लाखांचा सोन्या-रोख ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीती

Farmer Electrocuted: मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे शेतातील मोटार सुरू करताना ३२ वर्षीय शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

SCROLL FOR NEXT