sanjay raut 1.jpg 
मुंबई

नेहरु ते राजीव गांधींच्या पुण्याईवर आज देश चाललाय - संजय राऊत

'मागच्या सात वर्षात नवीन काही झालेलं नाही'

वैदही काणेकर

मुंबई: "नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्ष (seven years modi govt) पूर्ण झाली आहेत. देशासाठी अजून बरचं काही करायचं बाकी आहे. आज देश चाललाय. पण मागच्या साठ वर्षातला लेखाजोखा पाहिला, तर पंडित नेहरुंपासून ते राजीव गांधींच्या पुण्याईवर हा देश चाललाय" असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) म्हणाले. (In seven years modi govt didnt do anything new sanjay raut )

मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते. "मागच्या सात वर्षात नवीन काही झालेलं नाही. पण आपण अपेक्षा करु शकतो. अपेक्षा ठेवली पाहिजे. सरकारला लोकांनी बहुमताने निवडून दिलय. याचा अर्थ लोकांचा सरकारवर विश्वास आहे" असे राऊत म्हणाले.

"आजही देशात बेरोजगारी, महागाई आहे. कोरोनानंतर अराजकता कायम आहे. लोकांच्या मागण्या कमी असतात. सर्वांना अदानी, टाटा, बिर्ला, अंबानी बनायचे नाही. फक्त रोजी-रोटी मिळाली पाहिजे, त्यातही लोक खूश होतात. मोदी सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे, मागच्या सात वर्षात जनतेला हे मिळालय का? यावर भरपूर काम करण्याची गरज आहे" असे संजय राऊत यांनी सांगितले.

"भ्रष्टाचाराचे आरोप लागले नाहीत ही चांगली गोष्ट आहे. परंतु राहुल गांधी यांनी या काळात अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित केले त्याला कोणीही उत्तर दिलेलं नाही. राहुल गांधी वरिष्ठ नेते आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहे. विरोधी पक्षाचे नेते आहेत. राहुलजी सांगतायत ते गांभीर्याने ऐकलं पाहिजे" असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांनी का घातला गोंधळ? विरोधी पक्षनेत्याला बोलूच दिलं नाही; कामकाज तहकूब करण्याची वेळ

Crime News : घराच्या अंगणातच गाडले आई-वडिल अन् बहिणीचे प्रेत अन्... भयानक हत्याकांडापुढे 'दृश्यम' ची कहाणी देखील फेल !

मिचेल मार्शने केली पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद; India vs Pakistan लढतीवरील बहिष्कारावर विचारलेला प्रश्न अन्... Video

Latest Marathi News Live Update: अजित दादांच्या विमानाचा घातपात, आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडून तपास करा, सुषमा अंधारे यांची मागणी

Acidity Foods: सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? आजच आहारातील 'या' 3 पदार्थांना म्हणा टाटा-बाय-बाय!

SCROLL FOR NEXT