file photo
मुंबई

मुंबई: फोर्ट परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळला

आज सकळी ७.३० च्या सुमारास घडली घटना.

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत जुन्या जर्जर झालेल्या इमारतीचे भाग कोसळण्याच्या घटना सुरुच आहेत. आज सकळी ७.३० च्या सुमारास दक्षिण मुंबईतील (south mumbai) फोर्ट परिसरातील आशापुरा इमारतीचा स्लॅब कोसळला. (slab collapsed) सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. या इमारतीतून ३४ जणांची सुटका करण्यात आली आहे. (In south mumbai fort area asha pura building slab collapsed)

आशापुरा इमारतीचे बांधकाम सुरु होते. काही दिवसांपूर्वी मालाड मालवणी (malvani area) परिसरात एक इमारत कोसळली होती. या दुर्देवी दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला होता. ठाण्यातही मागच्या आठवड्यात एका इमारतीचा स्लॅब कोसळला होता. मुंबई आणि आसपासच्या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडत असतात.

जुन्या-जर्जर झालेल्या या इमारती कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप व्यक्तींना आपल्या प्राणांना मुकावे लागते. दरवर्षी मुंबई महानगर क्षेत्रात अशा घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू होतो. काही वेळा पालिका किंवा अन्य यंत्रणांकडून इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीसा पाठवल्या जातात. पण पर्यायी जागेची व्यवस्था नसल्यामुळे किंवा दिलेली जागा राहण्यायोग्य नसल्यामुळे नागरिक आपला जीव धोक्यात घालून त्याच धोकादायक इमारतींमध्ये राहतात.

चार मजली इमारतीचा मधला भाग कोसळला. या भागाची दुरुस्ती झाली होती. कोणीही बेपत्ता नाहीय किंवा जखमी नाहीय. आम्ही ढिगारा उचलण्याचं काम करतोय, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

मग अचानक एकदिवस इमारत कोसळल्याची बातमी येते. यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा इमारत कोसळण्याचे सत्र थांबलेले नाही. इमारत कोसळून दुर्घटना झाल्यानंतर मग त्यावरुन जोरदार राजकारण सुरु होतं. राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होता. पालिका, राज्य सरकारला जबाबदार धरलं जाते. मालाड मालवणी इमारत दुर्घटनेमध्ये हे दिसून आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT