मुंबई

Mumbai News : आयएसआयएस महाराष्ट्र मोडूयुल प्रकरणात आयएनएची छापेमारी

एनआयएने गुरुवारी आयएसआयएस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणातील अटक आरोपी शमिल साकिब नाचनच्या पडघा येथील घरावर छापेमारी केली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एनआयएने गुरुवारी आयएसआयएस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणातील अटक आरोपी शमिल साकिब नाचनच्या पडघा येथील घरावर छापेमारी केली आहे. छाप्यात देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडवण्यासंदर्भात अनेक दस्तावेज सामग्री जप्त केली आहे.

मुंबईतील 2003 च्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात यापूर्वी दोषी ठरलेल्या आणि 10 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या साकिब नाचनचा शमिल नाचन मुलगा आहे.यापूर्वी शमिलला एनआयएने 11 ऑगस्ट रोजी अटक केली होती.

आरोपी शमीलने दहशतवादी कृत्यांसाठी बॉंबस्फोट घडून आणण्याचे प्रशिक्षण घेऊन त्याची चाचणी करत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले. यापूर्वी अटक केलेल्या अकिब नाचण, जुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान,

मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण आणि इतर काही संशयितांसह इतर पाच आरोपींच्या सहकार्याने शमिल कारवाया करत होता.

शस्त्र बनवण्याचे ट्रेनिंग

एनआयएच्या तपासात अटक केलेल्या सहा जणांनी त्यांच्या साथीदारांसह आयसिसमध्ये काही तरुणांची भरती केल्याचे समोर आले. तरुणांना शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण दिले गेले असून आरोपींनी 'डू इट युवरसेल्फ किट्स' यासह संबंधित सामग्री देखील आपापसात सामायिक केली होती.

ज्यात बॉंब तयार करणे, लहान शस्त्रे, पिस्तूल इत्यादी बनवणे या कृत्यांचा समावेश होता. त्यांच्या परदेशातील आयसिसच्या हँडलर्सच्या निर्देशानुसार, आरोपींनी दहशतवाद आणि हिंसाचाराच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या मासिकात प्रक्षोभक मीडिया सामग्री देखील तयार केली होती, असेही 'एनआयएच्या तपासात समोर आले.

नातेवाईक अटकेत

पडघा परिसरातून 6 ऑगस्टला शमीलचा नातेवाईक अकिब नाचणलाही याच परिसरातून अटक केली होती. तर गेल्याच महिन्यात याच परिसरातून शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला या दोघांना अटक केली.

विशेष म्हणजे शमीलचा बाप साकिब नाचण हा बंदी असलेल्या ‘सिमी’ संघटनेचा पदाधिकारी होता. त्यामुळे देशविघातक व दहशतवादी कृत्यांत पडघा-सरकारच्या गुप्तचर यंत्रणेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाऊ लागले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT