mumbai sakal
मुंबई

कोपर्डी बलात्कार प्रकरणी सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाची असमर्थता

जिल्हा सत्र न्यायालयाने तिनही आरोपींना दोषी ठरवून फाशीची सजा सुनावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणार्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी आरोपींनी केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे आता अन्य खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या खटल्यातील आरोपींच्या याचिकेवरील सुनावणी मागील कित्येक वर्षे रखडली आहे. राज्य सरकारने या खटल्यातील तीनही दोषी आरोपींच्या अपील याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी सप्टेंबरमध्ये उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार आज न्या साधना जाधव आणि न्या प्रुथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे याचिकेची सुनावणी निश्चित केली होती. मात्र सोमवारी खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी असमर्थता व्व्यक्त केली. त्यामुळे आता याचिकांवर न्या एस एस शिंदे आणि न्या व्ही जी बिश्त यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पाच वर्षापूर्वी कोपर्डीमधील शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांनी आरोपी जितेंद्र उर्फ बाबुलाल शिंदे (25), संतोष भवाळ (30) आणि नितीन भैलुमे (26) यांना अटक केली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने तिनही आरोपींना दोषी ठरवून फाशीची सजा सुनावली आहे. या निकालाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात आपील याचिका केली आहे. आरोपी भैलुमे याने औरंगाबाद खंडपीठापुढे असलेला हा खटला मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने देखील फाशीची सजा कायम करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाने राज्य सरकारची आणि आरोपींच्या याचिकेवर मुंबईमध्ये सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

कोविडच्या निर्बधांमुळे या याचिकांवर अद्याप सुनावणी झाली नव्हती. आज यावर सुनावणी घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र आता संबंधित खंडपीठाने सुनावणीस नकार दिल्यामुळे आता अन्य खंडपीठापुढे सुनावणी घेतली जाईल.

कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. यामुळे एकत्रित झालेल्या सकल मराठा समाजाने राज्यात मूक मोर्चे आणि शांतता पूर्ण आंदोलने उभारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold and Silver Rates: १० दिवसांत सोन्याच्या दरात १३,४९४ ची घसरण, चांदीही स्वस्त झाली, खरेदीसाठी ही योग्य वेळ?

Latest Marathi News Live Update : अशोक खरातला थोड्या वेळातच कोर्टात हजर करणार

Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

IPL 2026:'मला मजा आली...' इशान किशन RCB विरूद्धच्या पराभवानंतर काय बालून गेला? विराट कोहलीबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT