Coastal Road Mumbai  esakal
मुंबई

Coastal Road Mumbai : कोस्टल रोडवरून प्रवासाचा पहिला मान महिलांना! अश्विनी भिडेंनी सांगितली प्रकल्पाची संपूर्ण माहिती

Coastal Road Mumbai : मुंबईतल्या किनारी रस्ता प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं सोमवारी लोकार्पण झालं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. मागच्या कित्येक वर्षांपासून रखडलेला कोस्टल रोड प्रकल्प मार्गी लागत असून या प्रकल्पाविषयी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी सविस्तर माहिती दिली.

संतोष कानडे

Coastal Road Mumbai : मुंबईतल्या किनारी रस्ता प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं सोमवारी लोकार्पण झालं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. मागच्या कित्येक वर्षांपासून रखडलेला कोस्टल रोड प्रकल्प मार्गी लागत असून या प्रकल्पाविषयी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी सविस्तर माहिती दिली. रस्त्यावरुन पहिल्यांदा प्रवास करण्याचा मान महिलांना देण्यात आलेला आहे. मनपाच्या महिला अधिकारी, कोळी महिला यांनी स्वयंचलित वाहनातून प्रवास केला.

अश्विनी भिडे म्हणाल्या की, महानगर पालिकेचा महत्त्वाकांक्षी आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी ही १० किलोमीटरची मार्गिका खुली झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

भिडे पुढे म्हणाल्या की, २०११ मध्ये कोस्टल रोडचं स्वप्न पाहिलं होतं. परंतु प्रत्यक्षात काम सुरु होण्यासाठी २०१४ उजाडावं लागलं. २०१८ मध्ये काही कारणामुळे काम स्थगित झालं होतं. आता मात्र केवळ ४५ महिन्यांत पहिला टप्पा पूर्ण झाला असून या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १४ हजार कोटी रुपये इतका आहे.

या प्रकल्पामध्ये वैशिष्ट्यपूर्ण इंजिनिअरिंग फिचर आहेत, शिवाय यात जुळे बोगदेही आहे. या प्रकल्पामुळे वेळेमध्ये ७० टक्क्यांची बचत होणार असून ३५ टक्के इंधनाची बचत होणार आहे. कोस्टल रोडच्या दोन्ही बाजूला ७० हेक्टर क्षेत्रावर उद्यानांचा विकास होणार असल्याचं भिडेंनी सांगितलं.

मनपाच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे पुढे म्हणाल्या, कोस्टल रोड प्रकल्प सर्वसमावेश असा आहे. नुकसानभरपाईपोटी मच्छिमारांना तब्बल १३७ कोटी रुपये दिले असून हा रस्ता सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे उर्वरित काम पूर्ण करता येणार आहे. ८ मार्च या महिला दिनाचं औचित्य साधून स्वयंचलित वाहनातून आलेल्या मनपाच्या महिला अधिकारी, महिला बचत गटाच्या प्रतिनिधींना घेऊन जाणाऱ्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधोरेखित करणाऱ्या बसेसला झेंडा दाखवून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाचा शुभारंभ केला.

या कार्यक्रमाला पारंपारिक वेशातील कोळी भगिनींचा सहभाग असल्याचं भिडेंनी स्पष्ट केलं. याशिवाय वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल्स असोसिएशनच्या विद्यमाने व्हिंटेज गाड्यांचा समूह यामध्ये सहभागी झाल्याचंही त्यांनी सांगितलं. कोस्टल रोड पर्यावरणपूरक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun : थारची रिक्षाला भीषण धडक, ५ जणांचा मृत्यू; चिमुकल्यासह आई-वडिलांचा मृतांमध्ये समावेश

Suryakumar Yadav Catch: बाऊंड्री लाईन मागे केली होती...! सूर्याच्या 'त्या' अविश्वसनीय कॅचवर भारतीय खेळाडूचा धक्कादायक दावा

Pune Airport : पुण्यात पावसाचा फटका; विमानसेवा विस्कळित, प्रवाशांची गैरसोय

Latest Marathi News Live Updates : उड्डाणपूल तयार पण नेत्यांना उद्घाटनाला वेळ मिळेना, सिंहगड रस्ता 'जॅम'

Mobile Recharge Price Increase : मोबाईल रिचार्ज महागले; 'या' बड्या कंपनीने बंद केला लोकप्रिय प्लॅन, ग्राहकांमध्ये संताप..

SCROLL FOR NEXT