Income of 78 lakhs from scrap materials Nesco Covid Center Mumbai sakal
मुंबई

Mumbai News : नेस्को कोविड सेंटरमधील भंगार साहित्यातून ७८ लाखांची कमाई

गोरेगाव नेस्को कोविड सेंटर मधील गोळा करण्यात आलेल्या भंगार साहित्यातून मुंबई महापालिकेच्या तिजोरीत ७८ लाख रुपये जमा होणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कोरोना बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे यासाठी मुंबईत ठिकठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यात यश आल्यानंतर कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. गोरेगाव नेस्को कोविड सेंटर मधील गोळा करण्यात आलेल्या भंगार साहित्यातून मुंबई महापालिकेच्या तिजोरीत ७८ लाख रुपये जमा होणार आहेत.

कोविडचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सुरु असलेल्या कस्तुरबा, सेव्हन हिल्स रुग्णालयांत कोविड रुग्णांवर उपचार तसेच विलगीकरणाची सुविधा अपुरी पडू लागली. त्यामुळे त्यावेळी बीकेसी, वरळी आणि त्यानंतर गोरेगाव नेस्को येथे कोविड सेंटर उभारुन रुग्णांना उपचाराची सुविधा देण्यात आली होती.

यासाठी नेस्को जंबो कोविड सेंटरच्या हॉलमधील १ ते ५ आदी ठिकाणी सेंटरची उभारणी करण्यात आली होती. या सेंटरच्या उभारणीसाठी प्रामुख्याने स्टील, अॅल्यूमिनियम, नोवापॅन शिट, सिमेंट वॉल पॅनल्सचा वापर करण्यात आला आहे. परंतु आता कोविडची लाट ओसरल्याने हे सेंटर बंद करण्यात आले आहे.

त्यामुळे सेंटरसाठी उभारलेले मंडपाचे साहित्य काढण्यात आले आहे. सध्यास्थितीत पुन्हा सेंटर उभारणीची शक्यता नसल्याने तसेच हे साहित्य अजून गंज लागू खराब होण्यापूर्वीच याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासर्व साहित्यासाठी महापालिकेने सुमारे ८३ लाख रुपयांचा महसूल अपेक्षित धरला होता. परंतु प्रत्यक्षात निविदा मागवल्यानंतर यासाठी गॅस ट्रेडींग कंपनीने कमी बोली लावून ७८ लाख रुपयांमध्ये हे भंगार सामान मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT