File Photo 
मुंबई

एसी डबल-डेकरमध्ये प्रवाशांची यामुळे होतेय गैरसोय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्‍चिम रेल्वेवरील मुंबई-अहमदाबाद एसी डबल-डेकर एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशांची गैरसोय होत असल्याची तक्रार रेल यात्री परिषदेने केली आहे. या रेल्वेगाडीत प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही असे सांगण्यात आले.

मुंबई सेंट्रल-अहमदाबाद मार्गावरील वातानुकूलित दुमजली एक्‍स्प्रेसची प्रवासी क्षमता अन्य रेल्वेगाड्यांपेक्षा 40 टक्के जास्त आहे. या गाडीतील एका डब्यातून 120 जण प्रवास करू शकतात. ही एक्‍स्प्रेस डबल डेकर असल्यामुळे सामान ठेवण्याचे रॅक अपुरे पडतात. परिणामी प्रवाशांची गैरसोय होते. काही प्रवासी जेवणाच्या टेबलवर सामान ठेवतात. दोन आसनांमधील जागेत सामान ठेवल्यामुळे ये-जा करण्यास त्रास होतो, अशा तक्रारी असल्याचे रेल यात्री परिषदेतर्फे सांगण्यात आले.

मुंबई आणि गुजरातच्या प्रवाशांसाठी एसी डबल डेकर गाडी महत्त्वाची आहे. या एक्‍स्प्रेचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असली, तरी सामान ठेवण्याची जागा अत्यंत कमी आहे. त्यामुळे पश्‍चिम रेल्वेने ही समस्या तातडीने सोडवावी.
- सुभाष गुप्ता,
अध्यक्ष, रेल यात्री परिषद

Inconvenience of passengers in AC double-decker

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठे भगदाड! प्रवाशांचा जीव धोक्यात, वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

Amba Ghat Tunnel : आंबा घाटातून प्रवास होणार अधिक सुरक्षित आणि वेगवान; मंत्री गडकरींनी 'या' महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत दिलं मोठं आश्वासन, थेट केंद्राकडून मिळणार निधी?

Latest Marathi News Update : मिसिंग लिंकवर दरड कोसळली, दरड आम्ही आणली नव्हती : बावनकुळे

Mumbai Rain: आपदा मे अवसर! पुराच्या पाण्यात वॉटर पार्कसारखा एन्जॉय, नालासोपाऱ्यातला व्हिडिओ व्हायरल

रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला २३ लाखांचा गंडा; नेपथ्यकारानेच फसवलं, कसं? नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT