increase demand syrups than fruits summer  sakal
मुंबई

Mumbai : उन्हाळ्यात फळांपेक्षा सरबतांच्या मागणीत वाढ!

उन्हाची काहिली वाढू लागताच नागरिकांच्या पोटाला थंडावा देणारे थंडगार पेयांची विक्री करणाऱ्या हातगाड्या दिसून येत ,या उन्‍हामुळे त्‍यांचा बाजार चांगलाच तापला

भारती बारस्कर

शिवडी : मुंबई शहर व उपनगरांमध्‍ये उन्हाची काहिली कायमच राहिल्याने पुढील दोन महिन्यांतील असह्य उन्हाळ्याच्या काळजीने मुंबईकर काळवंडून गेला आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघातासारख्या आजारांची भीती डोके वर काढू लागली असून घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी, असा सल्ला वैद्यकक्षेत्रातील जाणकारासह वडीलधारी मंडळी देत आहेत.

तर उन्हाची काहिली वाढू लागताच नागरिकांच्या पोटाला थंडावा देणारे काकडी, कलिंगड या फळांसह लिंबू सरबत, कोकम सरबत, नारळपाणी आदी थंडगार पेयांची विक्री करणाऱ्या हातगाड्या दिसून येत आहेत. या उन्‍हामुळे त्‍यांचा बाजार चांगलाच तापला असल्‍याचे येथील गर्दीवरून दिसून येते.

उन्हाळा आला आरोग्य सांभाळा, भरपूर पाणी प्या, शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे अधिक सेवन करा असा सल्ला डॉक्टर व घरातील थोर मंडळी देतात. अर्थात उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त गरज असते त्यामुळे साहजिक उन्हा-तान्हात बाहेर फिरताना जिव्हाची काहिली होऊन तहान लागते आणि थंडगार पेय किंवा फळे खाण्याकडे आपसुक पाय वळतात. त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी उन्हाच्या दिवसात रेल्वे स्थानकांबाहेरच्या पदपथांवर शहाळी विक्रेते, काकडी विक्रेते यांनी जागा हेरून ठेवल्या आहेत.

या भागात सर्वाधिक विक्री

सीएसएमटी, मशीद बंदर, दादर रेल्वे स्थानकाबाहेर सकाळच्या वेळी उपनगरांतून येणारी प्रत्येक गाडी बरीचशी रिकामी होते. या स्थानकाच्या पश्चिमेकडील फलाटाला लागूनच रस्त्यावर ताकाची जोरदार विक्री होत आहे. गाडीतून उतरणारे असंख्य प्रवासी येथे थांबून ताक, उसाचा रस, लस्सी, कलिंगड सलाड याचा आस्‍वाद घेताना दिसून येतात.

सध्‍या उन्‍हाळा वाढला असल्‍याने सरबताची मागणी वाढली आहे. विशेष करून तरुण वर्ग, महिला, नोकरदार वर्ग सरबतासाठी गर्दी करत आहेत. आरोग्‍यासाठी हितकारक सरबतांना पसंती दिली जाते.

– सचिन वामन, सरबत विक्रेते, मशीद बंदर

या शीतपेयांना अधिक पसंती

लिंबू सरबत, सफेद गुलाब सरबत, ऑरेंज सरबत, सिकंदर सरबत, जीरा मसाला, लाल गुलाब सरबत, अननस सरबत, कालाखट्टा विथ कलिंगड या सरबतांना अधिक पसंती मिळत असल्‍याचे विक्रेत्‍यांनी सांगितले आहे.

सरबत दर (रुपये प्रतिग्‍लास)

लिंबू सरबत १० ते १५

उसाचा रस १० ते २०

कोकम सरबत २०

सिकंदर सरबत २०

ऑरेंज सरबत २०

पायनॅपल सरबत २५

कालाखट्टा कलिंगडसह ३०

कलिंगड सरबत २५

लस्सी २५ ते ५०

नारळ पाणी ३० ते ५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

SCROLL FOR NEXT