मुंबई

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत राज्य सरकारच्या अडचणीत वाढ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर न्यायालयाचे ताशेरे

तुषार सोनवणे

मुंबई - मेट्रो कारशेडचा प्रकल्प आरेमधून कांजूरमार्गला हलवल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलेच वादंग निर्माण झाले होते. आता कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी राज्य सरकाच्या अडचणी वाढवणारी माहिती समोर आली आहे. 

कांजूरमार्ग येथे प्रस्तावित मेट्रो कारशेडचा 102 एकरचा भूखंड एमएमआरडीएला देताना जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात त्रुटी असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश मागे घ्यावा. त्यात सुधारणा करावी अन्यथा आम्हाला आदेशाची योग्यता तपासावी लागेल असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

मेट्रो कारशेडच्या जागेवर एका विकासकाने आपला दावा सांगितला आहे. केंद्र सरकारसोबत आपला करार असल्याचे त्याने न्यायालयात सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्य़ांनी 102 एकरचा भूखंड ज्यावेळी एमएमआरडीएला दिला त्यावेळी आपली बाजू ऐकून न घेत एकतर्फी निर्णय घेण्यात आल्याचे विकासकाने म्हटले आहे. 

विकासकाची बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राज्याच्या महाधिवक्त्यांना सांगितले की, राज्य सरकारला अशा प्रकारे आपल्या अधिकारांचा दुरूपयोग करू नये. हा दावा दिवाणी न्यायालयात प्रलंबित असताना, अशा पद्धतीचा आदेश काढणे योग्य नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश मागे घ्यावा आणि त्यात सुधारणा करावी अन्यथा या  आदेशाची योग्यता आम्हाला तपासावी लागेल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे, त्यामुळे आता राज्य सरकारच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे

Increase in difficulties of state government regarding Kanjurmarg metro car shed

-------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseeruddin Shah: 'प्रशंसा न करणं म्हणजे देशद्रोह...'! नसीरुद्दीन शाहांचा सरकारवर हल्लाबोल; ‘१९८४’ची आठवण गिरवली, काय म्हणाले?

OTT वर आणखी एक कोर्टरूम ड्रामा; ‘अमर विश्वास’चा ट्रेलर प्रसिद्ध; मुख्य भूमिकेत झळकणार हे अभिनेते

Latest Marathi News Live Update : विद्युत तारांच्या स्पार्किंगमुळे बाग जळून खाक

Pune Crime: फ्लॅटमध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय, बनावट ग्राहकांच्या मदतीने पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश

TRP मध्ये कमळी, स्वानंदी अन् तारिणीचं वर्चस्व! स्टार प्रवाहच्या टॉप मालिकांना धोबीपछाड; कोण कुठल्या स्थानावर?

SCROLL FOR NEXT