kalyan 
मुंबई

कसारा आणि कर्जतपासून लोकल फेऱ्या वाढवा - श्याम उबाळे

रविंद्र खरात

कल्याण - कल्याण पुढील कसारा आणि कर्जत मार्गावर लोकल फेऱ्या आणि अतिरिक्त लोकल सोडा ही मागणी केल्यावर रेल्वे प्रशासन हे शक्य नसल्याचे कारण सांगते आहे. यामुळे कसारा आणि कर्जत मधील राहणारा सर्वसामान्य चाकरमान्याला रेज त्रास होत आहे. आता नव्याने कल्याण ते नाशिक आणि कल्याण ते पुणे लोकल सेवा सुरू करण्याची चर्चा सुरू झाली आहे. ही सेवा देण्याऐवजी कसारा आणि कर्जतमध्ये राहणाऱ्यांसाठी वेळेत गाड्या सोडा अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गावरील प्रतिदिन 10 लाखाहून अधिक प्रवासी आपल्या कामानिमित्त नाशिक, पुणे आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करत आहेत. कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत दरम्यान लोकवस्ती आणि लोकसंख्या वाढत असताना त्यांना प्रवास करण्यासाठी एकमेव लोकल प्रवास असल्याने त्यात सुधारणा करून अतिरिक्त लोकल वाढवा. लोकल फेऱ्या वाढवा अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना मागील दोन ते तीन वर्षापासून करत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने या मार्गावर लोकल आणि मेल गाड्या अतिरिक्त सोडण्यास नकार दिला आहे. 

कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गावर आणखी रेल्वे मार्गिका काम पूर्ण झाल्यावर उपाययोजना करू असे आश्वासन प्रशासनाने केले होते. कल्याण ते नाशिक आणि कल्याण ते पुणे लोकल सुरू करण्याच्या हालचाली म्हणजे रेल्वे प्रवाश्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याची टीका रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. 

रविवारी कुर्ला कारशेडमध्ये नवीन लोकल दाखल झाली असून, त्यात तांत्रिक दुरुस्त्या काम सुरू असून लगेच कल्याण ते नाशिक आणि कल्याण ते पुणे मार्गावर ट्रायल अथवा लोकल धावणार नाही. याला या महिना अखेरीस किंवा एक महिना ही लागू शकतो. ट्रायल नंतर अनेक मंजुरी घ्याव्या लागतील नंतर पुढील घोषणा होईल. यासाठी कुठलेही वेळापत्रक बदल झाले नसल्याची माहिती मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT