corona 
मुंबई

दिलासादायक ! रायगड जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

सकाळवृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात आल्या आहेत. आतापर्यन्त 840 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 482 रुग्ण बरे झाले आहेत. इतर जिल्ह्याच्या तुलनेने रायगड जिल्ह्यातील कोरोनाबधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ झाली असूनही टक्केवारी सुमारे 58 टक्के इतकी असल्याची माहिती रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली.कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हयात लॉकडाऊनच्या कालावधीत  अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद करण्यात आल्या होत्या. प्रशासनाच्या आदेशानुसार हळूहळू जिल्हयात जनजीवन सुरळीत सुरु करण्याचा प्रयत्न अटीशर्तीनुसार करण्यात आला. परप्रांतियांना त्याच्या गावी जाण्यासाठी एसटी व रेल्वेची सोय केली होती. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, ओरीसा राज्यातील सुमारे 50 हजारहून अधिक परप्रांतिय कामगारांना त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे. जम्मू - काश्मीर येथील नागरिकांना नागपूरपर्यंत बसने पाठविण्यात आले. तेथून त्यांना काश्मीरला रवाना करण्यात आले.

मुंबई, सुरत, ठाणे, पुणे येथून सुमारे 95 हजारहून अधिक चाकरमानी आले. त्यातील काही जण चालत आले. तर काही जण खासगी व
अन्य बसद्वारे आले. त्यापैकी काहींना होम क्वारंटाईन तर काहींना इंस्टीट्यूड क्वारंटाईन करण्यात आले आहे.जिल्हयात 840 बाधीत झाले होते. त्यापैकी 482 जण बरे झाले असून 321 जणांवर उपचार सुरु आहेत. तसेच 37 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Increase in the number of corona-free patients in raigad Information of Collector Nidhi Chaudhary

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT