मुंबई

 २५ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत २० टक्क्यांची वाढ

भाग्यश्री भुवड

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच आता मागील २५ दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत २० टक्क्यांची वाढ झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे फेब्रवारीच्या तुलनेत ही वाढ चार पटींनी वाढल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. राज्यात मागील २५ दिवसामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या २०.३२ टक्क्यांनी वाढली आहे. ४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत नोंदविण्यात आलेल्या केसेसच्या तुलनेत मार्च महिन्यातील आकडेवारी ही ६ टक्क्यांनी वाढली आहे.

सध्या राज्यात कोरोना चाचणी केली जात आहे. या चाचणीमध्ये अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे नागरिक कोरोनाविषयी आखून दिलेले नियम आणि अटी पाळत नसल्यामुळेच ही रुग्णसंख्या वाढत असल्याचंही म्हटलं जात आहे.

आकडेवारीनुसार, ४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान १ लाख,१९ हजार ,०६८ एवढ्या केसेसची नोंद झाली होती. त्याच्या तुलनेत आता १ ते २५  मार्च दरम्यान राज्यात ४ लाख, ३९ हजार,३६६ केसेसची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार, राज्यात चार पटीने जास्त रुग्णसंख्या वाढली आहे. 

" राज्यात सर्व प्रकारच्या लक्षणांसाठी चाचण्या केल्या जात आहे. ज्या नागरिकांमध्ये लक्षणे आढळतात त्यांच्यावर उपचार करुन निदान केले जाते. चाचण्यांची संख्या वाढवली जाणार आहे, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. 

चाचण्यांमध्ये जवळपास ६० टक्के वाढ झाली आहे. उपलब्ध वैद्यकीय पायाभूत सुविधांमुळेच ही वाढ कायम ठेवू शकतो. मुंबईत दररोज चाचणी ५० हजार ते ६०हजारांपर्यंत चाचण्या केल्या जात आहेत आणि लसीकरणाचा ही वेग वाढत आहे, असं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

संपादन - शर्वरी जोशी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT