मुंबई

कोरोना चाचण्या वाढवल्याने रुग्ण संख्येत वाढ, मुंबई पालिकेचा दावा

भाग्यश्री भुवड

मुंबई: सप्टेंबर ऑक्टोबरनंतर मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होऊ लागला आहे. दिवाळीपूर्वी रोज 500 च्या घरात मिळणारे रुग्ण आता एक हजारांच्या घरात सापडत आहे. मात्र रुग्ण अधिक आढळत असले तरी ही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नसून कोरोना चाचण्या वाढवल्याने रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे मत पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 

पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजनांमुळे मुंबईत कोरोना चांगलाच नियंत्रणात आला आहे. 16 नोव्हेंबरला तर दैनंदिन रुग्णसंख्या केवळ 409 इतकी नोंदवली गेली. मात्र, गेल्या सलग चार दिवस रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले. रविवारी ही मुंबईत हजाराच्या वर रुग्ण आढळले होते. रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाची दुसरी लाट येणार का अशी भीती मुंबईकरांमधून व्यक्त केली जात आहे. मात्र ही कोरोनाची दुसरी लाट नसून चाचण्या वाढवल्याने रुग्ण जास्त सापडत असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

दिवाळी दिवशी 4 हजार चाचण्या करण्यात आल्या, दुसर्‍या दिवशी 5 हजार त्यानंतर 11 हजार आणि 16 हजार आणि दोन दिवसांपूर्वी 17 हजार 250 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. वाढलेल्या चाचण्यांच्या प्रमाणात जास्त रुग्ण आढळत असल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणारे सोशल डिस्टंसिंग पाळावे, मास्कचा वापर करावा आणि वारंवार साबणाने हात धुवत रहावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

पॉझिटिव्ह रेटमध्ये घट

मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर झपाट्याने रुग्णसंख्या वाढत गेली. यावेळी होणार्‍या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचे प्रमाण तब्बल 34 ते 35 टक्क्यांपर्यंत होते. मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. सद्यस्थितीत चाचण्यांमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण केवळ 6 टक्के असल्याची माहितीही अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी दिली. दरम्यान, मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर गेले असून आतापर्यंत 2 लाख 52 हजार 127 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत 17 लाख 73 हजार चाचण्या

मुंबईत कोरोना चाचण्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. यामध्ये 21 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 17 लाख 73 हजार 989 चाचण्या झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. सुरुवातीच्या काळात मुंबईत चाचण्यांचे दररोजचे सरासरी प्रमाण पाच हजार होते. मात्र सद्यस्थितीत दररोज सरासरी होणार्‍या चाचण्यांचे प्रमाण 17 ते 18 हजार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

Kirit Somaiya Amravati Meeting Controversy : आयुक्तांचा बचाव करणारे महापौर सापडले अडचणीत; किरीट सोमय्यांची अमरावतीची बैठक ठरतेय वादग्रस्त?

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT