increase in ST income by 100 crores due to holidays on Rakshabandhan
increase in ST income by 100 crores due to holidays on Rakshabandhan 
मुंबई

रक्षाबंधनाने एसटीला तारलं; उत्पन्नात 100 कोटी रुपये जमा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापुरामुळे दैनंदिन उत्पन्नावर विपरीत परिणाम झालेल्या एसटीला रक्षाबंधन व सलगच्या सुट्ट्यामुळे प्रवाशांनी तारले असून 15 ते 18 ऑगस्ट या चार दिवसात तब्बल 100 कोटी रुपयाचे उत्पन्न (प्रतिपूर्ती रकमेसह) एसटीला प्राप्त झाले आहे. ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन सरासरी उत्पन्नाच्या  तब्बल 25 कोटी रुपये जास्त उत्पन्न या काळात एसटीला मिळाले आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एसटीची प्रवासी संख्या प्रचंड कमी झाली होती. यंदाच्या रक्षाबंधन सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतूकीचे नियोजन केले होते. प्रत्येक विभागात, विभाग नियंत्रक यांच्या मार्गदर्शनाखाली 15 ते 18 ऑगस्टमध्ये जादा बसेस सोडल्या. 15 ऑगस्टला रक्षाबंधन व त्यानंतरच्या सलग सुट्ट्यांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होऊन दैनंदिन उत्पन्न तब्बल 25 कोटीपर्यंत पोहोचले. त्यामुळे 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान केवळ चार दिवसात तब्बल 100 कोटी रुपये उत्पन्न एसटीला मिळाल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT