मुंबई

धरणांच्या पाणी पातळीत होतेय वाढ शहरी व ग्रामीण भागात पावसाची दमदार हजेरी

राहुल क्षिरसागर

ठाणे: मागील अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागासह धरणक्षेत्रात देखील जोरदार हजेरी लावली. मागील दोन दिवसपासून कोसळणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. 

मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या धुवाँधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे भरून वाहू लागली होती. तर, उल्हास आणि वालधुनी नदीला पूर आल्याने अनेक गावे पाण्या खाली गेली होती. मात्र, यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच ओढ दिल्याने जुलै महिना उलटून देखील धरणांची पाणीपातळी 50 टक्क्यांहून कमी होती. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातवरण होते. त्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने धरणक्षेत्रातही चांगलीच हजेरी लावली आहे. 

संपूर्ण जिल्ह्यात सरारी 92.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यातील सर्वाधिक पाऊस ठाण्यात तर त्या खालोखाल भिवंडी तालुक्यात नोंदवला गेला. कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यातही सरासरी 100 मिलीमीटरपेक्षा अधिकच्या पावसाची नोंद करण्यात आली. मुरबाड आणि शहापूर तालुक्यात अनुक्रमे 24.4 आणि 80.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 
……………………

धरणे                    4 ऑगस्ट           6 ऑगस्ट (आजचा पाणीसाठा)          
भातसा                53.79 टक्के         58.17 टक्के
मध्य वैतरणा        35.24 टक्के           41.73 टक्के
बारवी                 49.20 टक्के         53.03 टक्के

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT