Disability Pension esakal
मुंबई

Disability Pension : उल्हासनगरातील 2199 दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये 700 रुपयांची वाढीव गिफ्ट

आयुक्तांच्या निर्णयामुळे दिव्यांग सुखावले

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : महानगरपालिकेत आज दिव्यांग प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ.अझिझ शेख यांनी उल्हासनगरातील 2199 दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये 700 रुपयांची वाढीव गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे.यापुढे दिव्यांगांना 1500 वरून 2200 रुपये मिळणार आहेत.आयुक्तांच्या या निर्णयामुळे दिव्यांग सुखावून गेले असून ऑगस्ट महिन्यापासून पेन्शनची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

शहरातील दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी,प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत,विविध सुविधा देण्यात याव्यात आदी मागण्या दिव्यांग प्रतिनिधींनी आयुक्त डॉ.अझिझ शेख यांच्याकडे केल्या होत्या.त्यानुसार डॉ.शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,उपायुक्त डॉ.सुभाष जाधव,उपमुख्य लेखापरीक्षक विलास नागदिवे,लेखाधिकारी संजय वायदंडे,दिव्यांग विभागप्रमुख राजेश घनघाव,वाहन विभागप्रमुख विनोद केणे,मालमत्ता विभागप्रमुख अलका पवार,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे,दिव्यांग प्रतिनिधी अशोक भोईर,सचिन सावंत,स्वप्निल पाटील,नरेश गायकवाड,रेहाना कुरेशी,राजेश साळवे,टिकम उदासी,निलेश जाधव,शैलेश तिवारी यांची बैठक पार पडली.त्यात डॉ.अझिझ शेख यांनी यापूर्वी मिळणाऱ्या दिव्यांगांच्या 1500 रुपये पेन्शनमध्ये 700 रुपयांची वाढ जाहीर केली आहे.

यासोबतच सर्व दिव्यांगांना ओळखपत्र देण्यात येणार असून त्यामुळे त्यांना उल्हासनगर महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.व्यायामशाळा,बेघर दिव्यांगासाठी वेगळे भवन व रात्र निवारा केंद्र उभारण्यात येणार असून व्यवसायासाठी चालना देण्यात येणार आहे.तसेच रोजगार निर्मतीच्या दृष्टीने महापालिका अंतर्गत शौचालयामध्ये देखभालीकरीता दिव्यांग व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: 'गट क' परीक्षेच्या अर्जासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ! 'एमपीएससी'चा निर्णय, 2 हजार 929 पदांसाठी भरती

Vasmat Politics: गोवंश प्रकरणातील गुन्ह्यानंतर वसमतचे उपनगराध्यक्ष इमरान अली यांचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Mark Zuckerberg: मार्क झुकरबर्गने मागितली माफी! पैशांच्या बदल्यात विशिष्ट कंटेंट प्रमोट केल्याची 'मेटा'कडून कबुली?

Latest Marathi News Live Update : जुलै २०२४ मधील विद्यार्थी आंदोलन शांततापूर्ण नव्हते - शेख हसीना

Ajinkya Rahane: 'धोनीच्या निवृत्तीनंतर विराट-शास्त्रींनी टीम इंडियाची मानसिकता बदलली...' रहाणे स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT