मुंबई

ठाणेकरांनो गणेशमुर्ती विसर्जनासाठी टाईमस्लॉट बुक केला का? दोन दिवसांत तब्बल 'इतक्या' जणांनी केली नोंदणी

शर्मिला वाळुंज

ठाणे - गणेश विसर्जनाच्यावेळी विसर्जन घाटावर गर्दी होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने महापालिकेच्या डीजीठाणे प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन टाईमस्लॉट बुकींगची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. ठाणेकरांनी या मोहीमेला उत्तम प्रतिसाद दिला असून दोन दिवसांत दोन हजाराहून अधिक ठाणेकरांनी त्यावर पूर्वनोंदणी करुन गणेश विसर्जन स्थळाची आणि वेळेची निश्चिती केली आहे. 

कोरोना संक्रमण काळात सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करुन भाविकांनी गणेश विसर्जन करावे यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने यावर्षी भाविकांना विसर्जन घाटावर येण्याच्या वेळेची पूर्वनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 14 ऑगस्टला सायंकाळपासून ही सेवा महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गणेश विसर्जन वेळेची पूर्वनोंदणी करण्यासाठी शहरातील 13 कृत्रीम तलाव आणि 20 मूर्ती स्वीकृती केंद्राची नावे, प्रभागसमिती, वेळ, ठिकाण अशी माहिती देण्यात आली असून नागरिकांनी ही माहिती भरुन आपली वेळ निश्चित करावी असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले होते. 20 हजार 555 वेळेचा पहिली यादी देण्यात आली आहे. दोन दिवसांतच या यादीतील वेळेची 2 हजार 393 वेळांची नोंदणी भाविकांनी केली आहे. तारखेनुसार यामध्ये नविन वेळांची यादीही महापालिका प्रशासनाकडून जाहीर केली जाणार आहे. 

ठाणेकरांचा या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना संक्रमण काळात सुरक्षित वावरात गणेश विसर्जन पार पडावे यासाठी भाविकांनी महापालिकेस सहकार्य करावे. त्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकृत डिडीठाणे डॅशबोर्ड लिंकवर जाऊन गणेश विसर्जन बुकींग हा पर्याय निवडून आपल्या प्रभागातील कृत्रीम तलावांची किंवा मुर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून मूर्ती विसर्जनासाठीची जवळच्या विसर्जन स्थळावरील आपली वेळेची नोंद बुक करावी असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे  )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT