Independence Day 2022 Govandi pollution measuring machines were installed instead of indian flags mumbai esakal
मुंबई

Independence Day 2022 : गोवंडीत झेंड्याएवजी लागली प्रदुषण मोजणारी यंत्रे

प्रदुषणामुळे एसएमएस हटावची स्थानिकांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एकीकडे मुंबईकरांना घरोघरी झेंडे लावले घरे, पण गोवंडीत मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे. याठिकाणी बायोमेडिकल वेस्ट ट्रिटमेंट प्लांटच्या प्रदुषणामुळे नागरिकांनी घरोघरी प्रदुषण मोजणारी यंत्रे वापरण्यासाठीची सुरूवात केली आहे. यंत्राच्या माध्यातून नोंदवण्यात येणारा डेटा हा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नागरिकांना अवगत करण्यात येणार आहे. गोवंडीत बायोमेडिक वेस्टच्या प्लांटमुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्लांटच्या चिमणीतून निघणाऱ्या धुरामुळेच अनेकांनी हा प्लांट गोवंडीतून हटवावा अशी मागणी केली आहे.

गोवंडीत 2009 साली बायोमेडिकल वेस्ट ट्रिटमेंट प्लांटची सुरूवात एसएमएस एनवोक्लीनने केली होती. त्याआधी डंपिंग ग्राऊंडच्या समस्येमुळेही नागरिक हैराण होते. या प्लांटविरोधात नागरिकांनी सातत्याने तक्रार केली होती. तसेच प्लांट गोवंडीतून बाहेर नेण्यात यावा अशीही मागणी सातत्याने करण्यात आली आहे. संगम नगर वेल्फेअर सोसायटीनेही हा प्लांट हटवण्यासाठी पाठपुरावा केला आहे. परंतु हा प्लांट हटवण्यासाठी मात्र सातत्याने नवनवीन डेडलाईन देण्यात आल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळेच प्रदुषण मोजण्यासाठीचा पुढाकार सोसायटीकडून घेण्यात आला आहे.

याठिकाणी लावण्यात आलेल्या यंत्रांमध्ये हवेच्या गुणवत्तेचे आकडे घेण्यात आले. त्यामध्ये हवेची गुणवत्ता ही खराब श्रेणीत नोंदवण्यात आली आहे. 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदुषण करणाऱ्या कणांचा वातावरणातील समावेश नोंदवण्यात आलेला आहे. या खराब हवेमुळे श्वसनाचे आणि दम्याचे आजार वाढण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच श्वसनासाठीही अडथळा निर्माण होऊ शकतो असे स्थानिकांचे म्हणणे आहे. कोरोनामुळे मास्कमुक्ती मिळाली असली तरीही गोवंडीच्या प्लांटमुळे याठिकाणी मास्क वापरण्याची वेळ आता स्थानिकांवर आली आहे, असे संगमनगर वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष फय्याज आलम शेख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT