Independence day 2022 Hosting Indian flag administrators for first time in history of Mumbai municipality sakal
मुंबई

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई तिरंगामय; इतिहासात पहिल्यांदाच प्रशासकांकडून ध्वजारोहण 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्याच्या आवाहनाला मुंबईकरांनी जोरदार प्रतिसाद दिला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्याच्या आवाहनाला मुंबईकरांनी जोरदार प्रतिसाद दिला. मुंबईतील चाळींपासून ते टोलेजंग टॉवर याठिकाणीही तिरंगा दिमाखात फडकत होता. मुंबई शहर आणि उपनगरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत राष्ट्रध्वज अभिमानाने आणि डौलाने फडकवत मुंबईकरांनी जल्लोष साजरा केला. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अवघी मुंबई तिरंगी झेंड्यांनी मुंबई सजली होती. मुंबईतील झोपड पट्ट्या, चाळी, इमारतींतील घराघरांवर, सरकारी कार्यालयांवर, वाहनांवर तिरंगी झेंडे फडकले. तर गल्लोगल्ली, चौका चौकातून प्रभात फे-यांनी आणि 'भारतमाता की जय' या घोषणांनी मुंबई दणाणली.

मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर राजभवनावर राज्यपालांनी, पालिका मुख्यालयावर पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी ध्वजारोहण केले. सरकारी कार्यालये, निमशासकीय कार्यालये, राजकीय पक्ष, शैक्षणिक, सामाजिक संस्था, झोपडपट्ट्या, गृहनिर्माण संस्थांनीही सकाळी ध्वजारोहण केले. देशभक्तीपर गीतांनी वातावरणात एक वेगळाच उत्साह पहायला मिळाला. मुंबईकरांनी दक्षिण मुंबईच्या दिशेनेही आज मोठी गर्दी करायला पहायला मिळाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगर पालिकेची इमारतींसह नरीमन पॉइंट येथील क्वीन नेकलेस आणि त्या लगतच्या इमारती तिरंग्याच्या विद्युत रोषणाईने झळाळून गेली होती. या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी मुंबईकर आणि पर्यटकांची गर्दी झाली होती. या ठिकाणचे सौंदर्य डोळ्यात आणि कॅमे-यात साठविण्यासाठी विविध भागातील नागरिक आले होते. सलग सुट्ट्या आल्याने जीवाची मुंबई करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे रस्ते वाहतूकीची कोंडीही झाली होती. तसेच लोकलही गर्दीने तुडूंब भरून जात होत्या. रस्त्यांतील दुतर्फा वाहनांवर झेंडे असल्याने झेंड्यांमुळे रस्ते फुलून दिसत होते.

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांनी विधानभवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या हस्ते, शिवसेना भवनाजवळ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुंबई महानगर पालिकेवर दरवर्षी महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. मात्र सद्या महापालिका बरखास्त झाल्याने पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ध्वजारोहण केले. विविध संस्था, संघटनांनी झोपडपट्या तसेच आदिवासी पाड्यात जावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, रमाबाई कॉलनी आदी झोपडपट्टी भागात हर घर संविधान साक्षर मोहिमेचा आढावा घेवून अमृत महोत्सवा निमित्ताने ७५ वर्षाचा लेखाजोखा मांडत विविध उपक्रम राबविले. स्वयंसेवी संस्था, संघटनांनी मुंबईच्या चौका- चौकात पथनाट्य, जलसा आदी जनजागृतीपर कार्यक्रम केले. या कार्यक्रमांना मुंबईकरांनी प्रतिसाद देत सहभाग घेतला.

पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासकांना मान

मुंबई महानगरपालिकेच्या 157 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिका प्रशासक पदावर असलेल्या इक्बाल सिंह चहल यांनी ध्वजारोहणाचा मान मिळवला. दरवर्षी हा मान मुंबईच्या महापौरांनाच मिळतो. पण यंदा सनदी अधिकारी म्हणून हा मान मिळवणारे इक्बाल सिंह चहल हे पहिले अधिकारी ठरले आहेत. आयुक्तांनी आज मुंबईकरांना मार्गदर्शन करत 30 मिनिट भाषण केले. महानगरपालिकेच्या बॅंड पथकाने यावेळी आयुक्तांना सलामी दिली. पालिकेच्या व्हुविंग डेक येथून आयुक्तांनी ही सलामी स्विकारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT