Viral Video Sakal
मुंबई

Independece Day : "ए वतन वतन मेरे आबाद रहे तू"; BMCवरील ध्वजारोहणाचा व्हिडिओ पाहून अभिमान वाटेल

आज देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आज देशभरात भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून भारतीयांना संबोधित केलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील मंत्रालय परिसरात ध्वजारोहण केलं. सध्या सगळीकडे ध्वजारोहणाचे आणि परेडचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातच बृहन्मुंबई महानगरपालिका भवनावरील ध्वजारोहणाचा व्हिडिओ समोर आला आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय येथे पोलिस दलाचे परेड पार पडले. फिरोजशाहा मेहता यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम पार पडला. महापालिकेच्या भव्य दिव्य इमारतीवर मानाने डोलणारा तिरंगा पाहून आपल्याला अभिमान वाटेल. या दैदिप्यमान सोहळ्याला अनेक नागरिक उपस्थित होते. हा व्हिडिओ mumbaicityexplore या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये विश्वकर्मा योजनेचा उल्लेख केला. त्याचबरोबर मणिपूर हिंसाचारावरही त्यांनी भाष्य केलं मणिपूरमधील नागरिकांनी शांतता राखली पाहिजे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT