Mumbai Local Train
Mumbai Local Train sakal media
मुंबई

Mumbai Train: उद्यापासून ऑफलाईन प्रक्रिया; लस प्रमाणपत्र बोगस असल्यास कारवाई

- समीर सुर्वे

मुंबई : स्वातंत्र दिनापासून (independence day) कोविड प्रतिबंधीत (corona vaccination) लसीचे दोन डोस घेतलेल्यांना (two dose0 लोकल प्रवासाची परवानगी (train permission) देण्यासाठी उद्या पासून ऑफलाईन प्रक्रिया (offline process) सुरु होणार आहे. मुंबईसह महामुंबईतील 109 रेल्वे स्थानकावर 358 लस प्रमाणपत्र पडताळणी कक्ष उभारण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राची पडताळणी (certificate checking) झाल्यानंतर रेल्वेचा फक्त पास मिळणार (railway pass) आहे. या प्रवाशांना दैनंदिन तिकीट काढता येणार नाही.

कोविड लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्यांना लोकल प्रवासासाठी स्वतंत्र ओळखपत्र देण्यात येणार आहे.यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात येणार आहे.मात्र,यासाठी काही कालावधी लागणार असल्याने रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन प्रक्रिया सुुरु करण्यात येणार ाहे.मुंबईतील 53 रेल्वे स्थानकांसह महामुंबईतील 109 रेल्वे स्थानकांवर स्थानिक महानगर पालिका नगरपालिका तसेच स्थानिक प्रशासनाचे मदत कक्ष सुरु करण्यात येणार आहेत.अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.मात्र,तुर्तास दोन डोस घेतल्यांना रेल्वे प्रवासासाठी पास मिळणार आहे.दैनंदिन तिकीट देण्यात येणार नाही असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

ऑनलाईन प्रकि्रया सुरु झाल्यानंतर ही प्रकि्रया अधिक सुलभ होणार आहे.कोविड लस न घेतलेल्या तसेच एकच डोस घेतलेल्या नागरीकांनी गर्दी करु नये.नागरीकांनी त्यांच्या जवळील रेल्वे स्थानकावरुन जाऊन ही ्रपक्रिया पुर्ण करावी असे आवाहन महानगर पालिकेने केले आहे.

समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती

सध्या प्रवासाची परवानगी असलेल्या शासकीय,निमशासकीय तसेच इतर कर्मचाऱ्यांना दोन डोसची अट नसणार असेही सांगण्यात आले.तसेच,विना अडथळा ही प्रकि्या पार करण्यासाठी महानगर पालिकेने समन्वय अधिकाऱ्याचीही नियुक्ती केली असल्याचे सांगण्यात आले.

तर हातात बेड्या पडतील

-लस प्रमाणपत्राची वैध्यता तपासूनच शिक्का मारण्यात येणार आहे.जर,हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळल्यास साथ नियंत्रण कायदा आपात्कालीन नियंत्रण कायदा तसेच भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी कारवाई होणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.यात,तुरूंगवास तसेच दंड अशा कारवाईची तरतूद आहे.

अशी आहे प्रक्रिया

-दुसऱ्या डोसच्या प्रमाणपत्राची पत्र,छायाचित्र असलेले ओळखपत्राची प्रत या कक्षात सादर करावी.

-दुसऱ्या डोसच्या प्रमाणपत्राची कोविन ॲपवर वैधत्या तपासल्यावर प्रमाणपत्राच्या तसेच ओळखपत्राच्या प्रतीवर शिक्का मारण्यात येईल.

-हे शिक्का मारलेले प्रमाणपत्र दाखवून रेल्वेचा पास काढता येणार आहे.

-हे प्रमाणपत्र 15 ऑगस्ट पासून वैध्य राहाणार आहे.

असे काम करेल कक्ष

-109 केंद्रांवर 358 कक्ष असतील.

-सकाळी 7 ते दुपारी 3

-दुपारी 3 ते रात्री 11 यावेळेत हे काम सुरु राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT