tata housing sakal media
मुंबई

टाटा हाऊसिंगची घर खरेदीदारांसाठी सवलत ; 'हॅपी 74' योजना जाहीर

तेजस वाघमारे

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या (independence day) अमृत महोत्सवी वर्षास 15 ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने टाटा हाऊसिंग कंपनीने (tata housing company) देशातील 16 प्रकल्पांसाठी (project) हॅपी 74 योजना जाहीर केली आहे. त्यानुसार या योजनांमध्ये घरे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना (home purchasing customers) मुद्रांक शुल्काच्या रक्कमेत (stamp duty) तब्बल 74 टक्के सवलत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ ग्राहकांना 30 ऑगस्टपर्यंत घेता येणार आहे.

नोटबंदी, जीएसटी आणि त्यापाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. घर खरेदीला चालना देण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिली. या कालाधित ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात घर खरेदी केली. ही सवलत वाढवावी अशी मागणी विकासकांच्या संघटनांकडून होत आहे.

मात्र त्याला सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या टाटा हाऊसिंग कंपनीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घर खरेदीदारांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. त्यानुसार 30 ऑगस्ट पर्यंत घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 74 टक्के मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना 20 लाख ते 5 कोटी रुपयांपर्यंतची सवलत मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

'असा व्यक्ती शोधा ज्याच्यासमोर तुम्ही' श्रद्धाने बॉयफ्रेंडबद्दल व्यक्त केलं प्रेम, म्हणाली...Viral Video

SCROLL FOR NEXT