INDIA Alliance Mumbai Meeting  esaka
मुंबई

INDIA Alliance Meeting Mumbai : 'इंडिया'च्या चौथ्या बैठकीचं ठिकाण ठरलं? एमके स्टालिन यांनी सुचवले नाव

रोहित कणसे

मुंबईत गुरुवारपासून सुरू झालेल्या विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. आज होणाऱ्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल अलायन्स (इंडिया) नेत्यांच्या औपचारिक बैठकीत आघाडीचे समन्वयक आणि लोगोबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान इंडियाची आजची तिसरी बैठक संपल्यानंतर चौथी बैठक चैन्नईत घेण्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सुचवले आहे.

दरम्यान काल मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात येथे पहिल्या दिवसाच्या बैठकीत ११ सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यावर एकमत झाले. ठरल्या प्रमाणे विविध समन्वय समिती या नेमल्या जातील मात्र त्यात प्रत्येक पक्षातील व्यक्तीला स्थान मिळेलच असे नाही याची स्पष्टताही केली गेली. तसेच आणखी काही पक्ष 'इंडिया' आघाडीत सामील होण्याच्या वाटेवर असल्याने जागा वाटपाबाबत आज पुर्णतः निर्णय होणार नसल्याची माहिती देखील समोर आली आहे.

ज्या राज्यात ज्या पक्षांची ताकद आहे त्यांना जागा वाटपात प्राधान्य राहिल. मात्र जागा वाटपावेळी इंडियातील इतर घटक पक्षांचाही विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईत सुरू असलेल्या या बैठकीत कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, बिहार चे मुख्यमंत्री नीतीश कुमार, अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर 28 पक्षांचे ६० हून अधिक नेते सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver : साताऱ्यातील 31,556 शेतकरी पात्र! अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; तुमच्या गावातील यादी 'येथे' पाहा

Mumbai Crime: लोक भवनाच्या नावाखाली रेल्वे तिकीट घोटाळा! खोटे शिक्के अन् राज्यपालांची बनावट सही, सूत्रधारासह ३ रेल्वे एजंट अटकेत

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! फिटमेंट फॅक्टरवर सरकारने पहिल्यांदाच मांडली अधिकृत भूमिका; संसदेत काय सांगितले?

Latest Marathi News Live Update : पुढील चोवीस तासांत विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Prashant Kishor: "माझ्याच पोलीस ठाण्यात मला धमक्या, एकदा वर्दी काढली तर..."; SHO अन् प्रशांत किशोर यांच्यात वाद, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT