INDIA Meeting Sakal
मुंबई

INDIA Meeting : इंडिया आघाडीचे फोटोसेशन! राहुल गांधी दाटीवाटीत तर संजय राऊत पहिल्या रांगेत; पहा कोण कुठे उभे

दत्ता लवांडे

मुंबई : देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये सुरू आहे. आज बैठकीचा दुसरा दिवस असून इंडिया आघाडीचा लोगो आणि संयोजक ठरवण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर नेत्यांच्या फोटोसेशनमध्ये पहिल्या रांगेत अनेक नेत्यांना स्थान मिळाले आहे. राहुल गांधी दाटीवाटीत उभे राहिल्याचं दिसत आहे.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या फोटोसेशनमध्ये पहिल्या रांगेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, मेहबुबा मुफ्ती, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, लालुप्रसाद यादव, एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, फारूक अब्दुल्ला या नेत्यांचा सामावेश आहे. तर राहुल गांधीही पहिल्याच रांगेत उभे आहेत पण ते इतर नेत्यांच्या दाटीवाटीत उभे असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.

तर दुसऱ्या रांगेमध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, उमर अब्दुल्ला हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर काही नेते दुसऱ्या आणि काही नेते तिसऱ्या रांगेत उभे आहेत. विशेष म्हणजे संजय राऊतांना पहिल्या रांगेत स्थान मिळाले आहे.

इंडिया आघाडीच्या संयोजक पदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता

इंडिया आघाडीच्या संयोजक पदावरून वाद निर्माण होणार आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर काँग्रेस आग्रही असून काँग्रेसने संयोजक पद न घेता आपलं मोठं मन दाखवावं असं कम्युनिस्ट पार्टीसह इतर पक्षांचे म्हणणे आहे.

या पदासाठी ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्या नावाचीसुद्धा चर्चा आहे पण खर्गे यांच्याकडे एक दलित चेहरा म्हणून पाहिलं जात असल्यामुळे संयोजक पदासाठी त्यांच्या नावाचीच जास्त चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT