मुंबई

भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग खोदण्याचे काम जानेवारी महिन्यापासून

समीर सुर्वे

मुंबई: जमिनीखालील भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग खोदण्याचे काम येत्या जानेवारी महिन्यापासून सुरु होणार आहे. नरिमन पॉईंट ते वरळी या 10 किलोमीटर लांबीच्या सागरी किनारी मार्गासाठी मलबार हिल टेकडी, गिरगाव चौपाटी खालून हा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. चीनवरुन आलेल्या 12 मीटरहून अधिक व्यासाच्या टनल बोअरींग मशिनची जुळवणी पूर्ण झाली असून या मशिनचे नामकरण ‘मावळा’असे काम करण्यात आले आहे. हा मावळा प्रत्यक्ष कामाला जानेवारी पासून सुरुवात करेल.

मुंबई महापालिका कोस्टल रोडसाठी मलबार हिल येथील प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी असे दोन प्रत्येकी 2.07 किलोमीटर लांबीचे बोगदे तयार करण्यात येणार आहे. हे दोन्ही बोगदे तयार करण्याचे काम दीड वर्षात पूर्ण होणार आहे, अशी माहिती कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी दिली.

हा बोगदा 10 ते 70 मीटरपर्यंत जमिनीखाली असेल असेही त्यांनी सांगितले. टनेल बोअरींग मशिनने खोदला जाणारा हा देशातील सर्वात मोठा बोगदा तर आहेच त्याच बरोबर जमिनीखालील जाणारही हा देशातील सर्वात मोठा बोगदा आहे. गिरगावच्या समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून काताळा खाली 20 मीटर खाली हा बोगदा तयार करण्यात येणार आहे.

चीनमधील ही टनल बोअरींग मशिन आणण्यात आली आहे. मात्र त्यानंतर चीन आणि भारताचे संबंध ताणले गेल्याने भारतीय अभियंत्यांनी या मशिनची जुळवणी केली आहे. मशिनची संपूर्ण जुळवणी झाली आहे. फक्त मशिनला खोदकाम करणारा पुढील भाग जोडण्याचे काम बाकी आहे. हे कामाही येत्या काही दिवसात सुरु होणार असून जानेवारीपासून प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात होणार आहे.

कोस्टल रोडसाठी प्रत्यक्ष खर्च 8 हजार 429 कोटी रुपये खर्च असून सर्व कर धरुन हा खर्च 12 हजार 721 जाणार आहे. आतापर्यंत 1300 कोटी रुपये खर्च झाला आहे. प्रत्यक्षात 30 टक्के काम होणे अपेक्षित होते. मात्र आता पर्यंत 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामाला 8 महिने न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब झाला आहे. मार्च पासून सुरु झालेल्या लॉकडाऊनचाही परीणाम झाला आहे. यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण रस्त्याचे काम ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र झालेल्या विलंबामुळे हे काम जुलै 2023 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. 

चार विमानापेक्षाही जास्त वजन

या टनल बोअरींग मशिनचा व्यास 12.2 मीटर असून साधारण चार मजली इमारतीची उंची आहे. या मशिनचे वजन 2300 मेट्रीक टन आहे. या मशिनचे वजन चार बोईंग जेट पेक्षाही जास्त आहे. दिवसाला 2 ते 8 मीटर पर्यंतचे खोदकाम ही मशिन करणार आहे.

 
राडारोडा भरणीसाठी

खोदकाम करण्यात येणार भाग टेकडीचा असल्याने खडक अत्यंत मलबार हिल खालील खडक अत्यंत कठीण आहे. साधारण कॉंक्रिटच्या भिंतीच्या पाच पटीने हा खडक टणक आहे. खोदकामात तयार होणारा राडारोडा पाईपाच्या सहाय्याने बाहेर स्वयंचलित पध्दतीने बाहेर आणण्यात येणार आहे. या खडकावर प्रक्रिया करुन तो समुद्रातील भरणीसाठी वापरण्यात येणार आहे.
 
वरळीला बस डेपो

महानगर पालिकेला या 10 किलोमीटरच्या मार्गावरुन स्वतंत्र मार्गिकेतून बस सेवा सुरु करणार आहे. त्यासाठी वरळी येथे डेपाही तयार करण्यात येणार आहे. वरळी 400, हाजीअली येथे 1200 आणि अमरन्स उद्यान येथे 200 वाहनांची सोय असेल असे वाहनतळही बनवण्यात येणार आहे.

 
तीन इंटन कनेक्ट

कोस्टल रोडला तीन इंटनकनेक्टही देण्यात येणार आहे.वरळी, हाजीअली आणि अमरन्स उद्यान येथे हे इंटनकनेक्ट असतील.त्यातून वाहनांना कोस्टल रोड वरुन बाहेर जाणे तसेच कोस्टल रोडवर येणे शक्य होणार आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

India largest Nariman Point to Worli 10 Kilometer subway Work started in January

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT