Nana Patole 
मुंबई

INDIA Meeting: इंडिया आघाडीची ताकद वाढली! आणखी दोन पक्षांचा समावेश; पटोलेंनी सांगितली उद्याच्या बैठकीची रुपरेषा

मुंबईत इंडियाच्या बैठकीचं स्वरुप कसं असेल? कुठले मुद्दे चर्चेला येणार?

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी एकत्र आलेल्या देशातील सर्व प्रमुख विरोधीपक्षांच्या इंडिया आघाडीची ताकद आणखी वाढली आहे. यापूर्वी या आघाडीत २६ राजकीय पक्षांचा समावेश होता आता ती संख्या २८ इतकी झाली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

उद्या मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक पार पडणार आहे, यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. (INDIA Meeting Mumbai strength increased Inclusion of two more parties says Nana Patole)

नाना पटोले म्हणाले, आम्हाला आनंद होतोय की महाराष्ट्रात इंडिया आघाडीचा बैठक होत आहे. याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृती प्रमाणं या बैठकीला हजेरी लावणाऱ्या स्वागत केलं जाणार आहे. इंडिया आघाडी वाढत चालली आहे. कारण बंगळुरुच्या दुसऱ्या बैठकीत आम्ही २६ पक्ष होतो आता मुंबईतल्या बैठकीपर्यंत २८ पक्ष झाले आहेत.

इंडिया पुढे जाईल तसा चीन मागे सरकेल

जसं संजय राऊत यांनी सांगितलं आहे की, अरुणाचल प्रदेश हा भाग असल्याचं चीननं म्हटलं आहे. पण जशी इंडिया आघाडी पुढे जाईल तसा चीन मागे सरकेल. याचसाठी आम्ही महाविकास आघाडीच्यावतीनं या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे.

इंडियाचं रक्षण करणं सर्वांची जबाबदारी

अशोक चव्हाण म्हणाले, "इंडियाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. इंडियाच्या बैठकीची तयारी जोरात झाली आहे. यात सहभागी होणारे राजकीय पक्ष पूर्वी २६ होते ते आता २८ झाले आहेत. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी सर्वजण जोरात काम करत आहेत. महाराष्ट्रानं कायम देशाला लीड केलं आहे, राजकीय क्रांतीचं केंद्रही कायम मुंबई आणि महाराष्ट्र राहिलं आहे"

भाजपपेक्षा इंडियाच्या मतांची टक्केवारी जास्त

२०१९च्या लोकसभा निवडणुकीतील मतदान आपण पाहिलं तर आमच्या महाआघाडीत जे सर्व पक्ष सहभागी झाले आहेत. त्यांनी सर्वांनी मिळून २३ कोटी ४० लाख मत मिळवली होती. तर भाजपला २२ कोटी ९० लाख मतं मिळाली होती. त्यामुळं सर्व पक्ष वेगवेगळे लढल्यानं मतांचं विभाजन झालं होतं. त्यामुळं त्याचा फायदा भाजपला मिळाला होता.

इंडियात ११ राज्यांचे मुख्यमंत्री

त्यामुळं आता इंडिया आघाडीत ११ राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी आहेत. यामध्ये भाजपनं तोडून मोडून सरकारं स्थापन केलेल्यांचा समावेश नाही. सर्व प्रमुख राजकीय पक्ष आमच्यासोबत आहेत. कोणाला विरोध करणं हाच केवळ आमचा अजेंडा नाही. तर आम्ही डेव्हलपमेंटल अलायन्स आहोत. त्याचबरोबर देशातील ज्या हुकुमशाही शक्ती आहेत त्यांना रोखण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT