Indian Air Force
Indian Air Force Sakal
मुंबई

India Air Force : भारतीय वायुसेनेचा जपानच्या वायुसेनेशी संयुक्त युद्धाभ्यास

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - भारत आणि जपान या देशांच्या वायुसेनाना परस्पर सहकार्याला चालना देण्यासाठी, भारत आणि जपान दोन्ही देशाच्या वायुसेना एकत्र युद्धाभ्यास करणार आहेत. 12 जानेवारीपासून 26 जानेवारी पर्यंत जपानच्या हयाकुरी हवाई तळावर भारतीय वायू दल आणि जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स संयुक्त युद्धाभ्यास करणार आहेत. 'वीर गार्डियन-2023' असे संयुक्त कार्यक्रमाला नाव देण्यात आले आहे.. हवाई युद्धाभ्यासात सहभागी होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या तुकडीत 4 सु-30 एमकेआय, 2 सी-17 ग्लोबमास्टर आणि 1 आयएल-78 ही विमाने असतील. तर जापानी वायुसेनेतर्फे 4 एफ-2 आणि चार एफ-15 नावाची विमाने सहभागी होतील.

08 सप्टेंबर 2022 रोजी टोकियो, जपान येथे झालेल्या दुसऱ्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रिस्तरीय बैठकीत, भारत आणि जपानने द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्यास आणि पहिल्या संयुक्त लढाऊ जेट कवायतींसह अधिक लष्करी सरावांमध्ये सहभागी होण्याचे निर्णय घेतले होते, जे वाढत्या स्थितीचे प्रतिबिंबित करते. दोन्ही बाजूंमधील सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी तसेच देशांमधील धोरणात्मक संबंध आणि घनिष्ठ करण्यासाठी पाऊल उचलले आहे .

युद्धाभ्यासामध्ये दोन्ही हवाई दलांमधील विविध हवाई लढाऊ कवायतींचा समावेश असेल. दोन्ही देशांचे तज्ञ विविध ऑपरेशनल पैलूंवर त्यांचे कौशल्य सामायिक करण्यासाठी चर्चा करतील. 'वीर गार्डियन' या सरावामुळे मैत्रीचे दीर्घकालीन बंध दृढ होतील आणि दोन्ही हवाई दलांमधील संरक्षण सहकार्याचे मार्ग प्रशस्त करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT