navy 
मुंबई

नौदलातही पर्यावरण रक्षणाचे उपाय; नवनवीन साधनांचा करणार वापर

सकाळवृत्तसेवा

मुंबई ः  इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या भारतीय नौदलातही पर्यावरण रक्षणाची जाणीव वाढत असून नौदलातही आता इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढविण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नौदलाने ही माहिती दिली आहे. पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न, पर्यायी इंधनाचा वापर व हरित प्रकल्पांचा अवलंब करून उर्जा बचत व प्रदूषणावर मात करण्याचा निर्धार नौदलाने केला आहे. 

नौदल तळांवर गरज नसताना विजेच्या उपकरणांचा वापर आपोआप बंद व्हावा, यासाठी सेन्सरचा उपयोग होत आहे. त्याखेरीज विजेच्या दिव्यांचा कमीतकमी वापर व्हावा यासाठी पारदर्शक अक्रेलिक छताचा उपयोग केला जात आहे. तसेच सौरउर्जा प्रकल्पांचा आणि सौर उपकरणांचा वापरही वाढवला जात आहे.

नौदलाच्या युद्धनौकांना व पाणबुड्यांना चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इंधन लागते. या नौका समुद्रात चालत असल्याने तेथे प्रदूषणाचा फारसा प्रश्न नसतो, अशी सामान्यांना वाटत असते. मात्र या नौकांसाठी इंधन वापरल्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी नौदलाने इंडियन ऑईल बरोबर सहकार्य करून आंतरराष्ट्रीय दर्जानुसार स्वच्छ इंधन वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार इंधनातील सल्फरचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. प्रत्येक युद्धनौकेवर पाणी व तेल (इंधन) वेगवेगळी करणारी उपकरणे तसेच बोटीवर निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी उपकरणे बसविण्यात आली आहेत. समुद्रातील प्रत्येक युद्धनौकांवर या यंत्रांची गरज असतेच, नेव्हल मटेरियल रीसर्च लॅबमार्फत ही उपकरणेही तयार केली जातात. 

यापुढे युद्धनौकांवर, तसेच जमिनीवरील नौदल तळांवर पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांऐवजी विजेवर चालणारी इ सायकल, इ ट्रॉली व इ स्कूटर यांचा वापर हळुहळू वाढविण्यात येईल. अनेक तळांवर एक विशिष्ठ दिवस हा बिगर वाहन दिवस म्हणून पाळण्यात येतो व त्यादिवशी नेहमीच्या इंधनावर चालणारे वाहन वापरले जात नाही. एखाद्या तळावर नेहमीच्या इंधनावर चालणारे एकही वाहन नसावे, अशीही संकल्पना लवकरच अंमलात आणली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV New Rules : सरकारची करडी नजर तुमच्या टीव्हीवर! मोफत टीव्ही पाहणे पडेल महागात? TRAIचे नवीन नियम जाणून घ्या

इराणमध्ये घुसून अमेरिकेच्या SEALने पायलटला सुखरुप परत आणलं; भारताकडेही आहे MARCOS, पाकिस्तानला कळणारही नाही की...

Pakistan Petrol Rate : पेट्रोल दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये जनतेचा संताप उसळला; एक लीटरची किंमत ऐकून धक्का बसेल

Sangli Crime : रक्ताळलेली सांगली! 4 दिवसांत 6 खून; कुपवाडमध्ये पत्नीनेच पतीला संपवलं, तर कवलापूरच्या यात्रेत अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या

Chhatrapati Sambhajinagar: पीएनजी कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था; बजाजनगरमध्ये उखडलेले रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिक त्रस्त

SCROLL FOR NEXT