indian student in ukraine Sakal
मुंबई

Ukraine: ठाण्यातील दोन विद्यार्थ्यांचा संपर्क तुटला; पालक धास्तावले

युक्रेन रशिया युद्धात युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भारतातील विद्यार्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

कळवा : युक्रेन रशिया युद्धात युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भारतातील विद्यार्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंब्रा येथील एकाच कुटुंबातील नौशाद खान व सोहेब खान हे MBBS शिक्षणासाठी युक्रेन मध्ये गेले आहेत ते शेवटच्या वर्षांत शिकत आहेत. सध्या हे विद्यार्थी रोमानिया सीमेपासून १२ किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी भारत सरकारने वेगवान प्रक्रिया हाती घेण्याचा टाहो सोहेबचे काका निजामुद्दीन याने फोडला आहे. (Indian Student In Ukraine)

ते मुंब्र्यातील तन्वरनगर येथे राहतात. त्यांची दोन्ही मुले ज्या परिसरात आहेत त्या ठिकाणी जोरदार बर्फ पडत असल्यामुळे ते सर्दीने ग्रासले आहेत. गेल्या तीन दिवांसापूर्वी युक्रेन सोडण्याबाबत भारतीय राजदूत कार्यालयात कळवले आहे. सध्या जे तेथे आहेत त्या ठिकाणी एकाच विद्यापीठाचे जवळ पास अंदाजे चार हजार विद्यार्थी तेथे अडकल्याचे बोलले जाते. तेथे पुरेशी पाणी पिण्याची व मोबाईल चार्जिंगची व्यवस्था नाही. त्यांची कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

नौशादच्या वडिलांची प्रकृती खालावली

मुलाची माहिती मिळत नसल्याने व तेथील वातावरण बदलल्याने मायदेशी परत येण्यााठी उशीर होत असल्याने त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांचा रक्तदाब वाढला आहे. ते येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Work Visa Rules: सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! वर्क व्हिसा नियम बदलले; भारतीय कामगारांवर काय परिणाम होणार?

Vaibhav Sooryavanshi ला 'राड्या'नंतर बीसीसीआयने एकटे पाडले; सचिव देवजित सैकिया म्हणाले, आम्ही या प्रकरणात...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

Shubman Gill:'गिलला टी-२० संघातून का डच्चू दिला?' मोहम्मद अझरुद्दीनचा BCCI ला थेट सवाल

Pune Bangalore Highway : 92 पिलर अन् 3.47 किमी लांबी! पुणे-बंगळूर महामार्गावरील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार? लोकार्पण लांबणीवर, वाचा नवीन अपडेट

SCROLL FOR NEXT